सोलापूर - सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची घोषणा करत सरकारने अन्यायकारक निर्णय घेतला आहे. त्यामुळे तमाम सिद्धेश्वर भक्तांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात सोमवार सोलापूर बंद करण्यात आला. सकाळ पर्यत सोलापूर बंद ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी हिंसक वळण लागले. सोलापूर बाजार समिती, कापड मार्केट बाजार बंद ठेवण्यात आला आहे.
सोलापूर विद्यापीठला सिद्धेश्वर नाव देण्याच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी 8 वाजता सिद्धेश्वराची महाआरती करुन या सरकारला सद्बुद्धी देण्याचे साकडे विविध महिला संघटनानी घातला आहे. सोलापूर ही सिद्धेश्वरांची जन्मभूमी व कर्मभूमी आहे. 800 वर्षापासून सोलापूर व सिद्धेश्वर हे समिकरण आहे. बाराव्या शतकातील या थोर समाजसुधारकाचे नाव सोलापूर विद्यापीठाला देण्याची मागणी तमाम सिद्धेश्वर भक्त स्थापनेपासूनच करीत आहेत. मात्र सरकारने या मागणीस वाटाण्याच्या अक्षता लावल्या. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाला आमचा विरोध नाही. देशात किंवा राज्यात कुठल्याही संस्थेला देता आले असते. मात्र सोलापूर या एकच जिल्ह्यासाठी स्थापन झालेल्या विद्यापीठाला सिद्धेश्वर यांचे नाव देणे अधिक संयुक्तिक होते.
एवढेही ज्ञान सरकारला नसल्याने सिद्धेश्वरांनी त्यांना सद्बुद्धी देण्याचे साकडे महाआरतीने महिला संघटनानी घातला आहे. या महाआरतीस बसव केंद्र, महाराष्ट्र वीरशैव सभा महिला आघाडी, अक्कनबळग महिला मंडळ, शिवा संघटना महिला आघाडी, वीरशैव व्हिजन महिला आघाडी, शंकरलिंग महिला मंडळ, नाडहब्ब महिला महोत्सव, मड्डी वस्ती बसव केंद्र, अखिल भारतीय वीरशैव सभा महिला आघाडी , कांचन फाऊंडेशन, जंगम समाज महिला मंडळ, वीरशैव लिंगायत युवक प्रतिष्ठान महिला आघाडी, भगवती गौरीमाता भजन मंडळ होटगी मठ, धानेश्वरी महिला मंडळ, सारथी महिला मंडळ, ओंकारेश्वर रुद्र मंडळ, वीरशैव महिला मंडळ, श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ, उमा महिला मंडळ, तनिष्का महिला मंडळ, वीरशैव सखी क्लब , किरिटेश्वर महिला भजनी मंडळ या संघटना सहभागी होत्या.