शीतलकुमार कांबळे, सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापाठाकडून उद्योजकता विकास यात्रा काढण्यात आली. या यात्रेत सात हजार नव उद्योजकांपर्यंत विद्यापीठ पोहोचले आहे. यातून सात विद्यार्थ्यांची बिझनेस आयडीया विद्यार्थ्यांना पटली असून पुढील मदतीसाठी ही आयडीया शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
स्वावलंबी भारत अभियान आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उद्योजकता विकास यात्रेचा समारोप झाला. या यात्रेतून सात हजार विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. तसेच 11 विद्यार्थ्यांच्या आयडीयाची प्राथमिक निवड केली आहे. त्यातून अंतिम सात आयडीयांची निवड होणार आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इनक्युबेशन सेंटरकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आयडीयाचे प्रोडक्ट कसे बनवायचे याचे एक वर्षासाठीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थी हे त्यांची कल्पना एंजेल इनवेस्टर यांच्याकडे मांडू शकतील. इनवेस्टर यांना कल्पना पटली तर ते विद्यार्थ्यांच्या आयडीयामध्ये गूंतवणूक करतील.नव्या कल्पना मांडणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही एकटे नाही विद्यापीठाचे इन्क्युशेशन सेंटर सोबतीला आहे, असा विश्वास दिला आहे. विद्यार्थ्यांच्या आयडीयाला प्रोडक्टमध्ये रुपांतर करण्यासाठी शासन 15 लाखांपर्यंत मदत करणार आहे. - डॉ. सचिन लड्डा, संचालक, नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य मंडळ