सोलापूर : सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद चिघळला आहे. विद्यापीठाला ‘शिवयोगी श्री सिद्धेश्वर विद्यापीठ’ असे नाव द्यावे, या मागणीसाठी सोमवारी लिंगायत समाजाने ऐतिहासिक मोर्चा काढला.दुसरीकडे धनगर बांधवांनी राज्य शिक्षण पुरस्कार वितरण कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अंगावर भंडारा उधळत कार्यक्रमातच जोरदार घोषणाबाजी केली. सुमारे महिनाभरापूर्वी धनगर समाजाने भव्य मोर्चादेखील काढला होता.‘बोला, बोला एकदा; भक्तलिंग हर्र...बोला हर्र, श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय’ अशा जयघोषात, हजारो लिंगायत समाज बांधवानी मोर्चा काढला़ कौतम चौकातील महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, मोर्चास प्रारंभ झाला़बाराबंदीच्या वेशातील मोर्चेकरी, हातात भगवे झेंडे, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हातातील मागण्याचे पोस्टर्स, डोक्यावर शिवा लिहिलेल्या टोप्या, बाराबंदीच्या वेशातील लहानमुले मोर्चातील सर्वांचे आकर्षण ठरले़ हलग्यांच्या आवाजांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले़कौतम चौक ते होम मैदान हा परिसर सिद्धेश्वरांच्या नावाने दुमदुमला होता़ शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांना निवेदन दिले़शासनाने मंजुरी देऊन, मार्च २०१५च्या अर्थसंकल्पात तरतूद केल्यानुसार, मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर यांचे राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील उस्मानाबाद,लातूर, बीड, परभणी जिल्ह्यातूनआणि कर्नाटक, आंध्र प्रदेशातून लिंगायत बांधव मोर्चात सहभागझाले होते.>शिक्षणमंत्र्यांवर भंडारा उधळलाराज्य शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडला़ शिक्षणमंत्री तावडे हे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करीत असताना, युवकांचा एक गट वर आला आणि त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्याला विरोध दर्शविणाºया ‘शिक्षणमंत्र्यांचा निषेध असो’ अशा घोषणा देत, त्यांच्यावर भंडारा उधळला़‘माँसाहेब जिजाऊ’ नाव देण्याचीही मागणीसोलापूर विद्यापीठाला ‘माँसाहेब जिजाऊ’ यांचे नाव देण्यात यावे, असेदेखील पुढे आले आहे. नामांतरासाठी विद्यापीठाच्या सिनेटने ठराव करून पाठवावा लागतो. त्यानंतर, तो राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांच्यासमोर ठेवला जाईल, नंतर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नामांतराबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडच्या बाबतीत हीच प्रक्रिया राबविली होती, असे सांगत, नामांतराचा प्रश्न निकाली काढला जाईल, असेही तावडे म्हणाले.>...तर मंत्र्यांच्या तोंडाला भंडारा फासूबीड : सोलापूरात शिक्षण मंत्रीविनोद तावडे यांच्या कार्यक्रमात भंडारा उधळणाºया कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यांची तातडीने सुटका केली नाही तर मंत्र्यांच्या तोंडाला भंडारा फासू, असा इशारा यशवंत सेनेच्या वतीने भारत सोन्नर यांनी दिला आहे.
सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद चिघळला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 4:34 AM