शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

सोलापूर जिल्ह्यात शेतीसाठी सोलरचा वापर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:29 PM

महावितरणचा उपक्रम ; ३११ शेतकºयांनी भरले पैसे; ४४९६ अर्ज प्राप्त

ठळक मुद्देमार्च १८ पर्यंत कोटेशन भरलेल्या ९ हजार १८८ शेतकºयांना स्वतंत्र किंवा दोन-तीन शेतकºयांमध्ये स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचे काम केले जाणार जिल्हाभरातून ४ हजार ४९६ शेतकºयांनी अर्ज केले होते. यातून २७८७ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत

सोलापूर : मुख्यमंत्री सोलर कृषी पंप योजनेसाठी जिल्ह्यातून ४४९६ शेतकºयांनी अर्ज केले होते, त्यापैकी ३११ शेतकºयांनी कोटेशन भरले आहेत. सोलापूर जिल्ह्यात प्रथमच सोलरवर शेतीपंप सुरू होणार आहेत.

शेतीपंपासाठी वीज कनेक्शनसाठी पैसे भरूनही कनेक्शन मिळत नसल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. अशातच मार्च २०१८ पर्यंत पैसे भरलेल्या शेतकºयांना कनेक्शन देण्यासाठी उच्च दाब वितरण प्रणाली योजनेतून ठेकेदाराला काम दिले आहे. मार्च १८ पर्यंत कोटेशन भरलेल्या ९ हजार १८८ शेतकºयांना स्वतंत्र किंवा दोन-तीन शेतकºयांमध्ये स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचे काम केले जाणार आहे. याची निविदा कंपनीला दिली असल्याचे सांगण्यात आले.

मात्र ज्या ठिकाणी वीज कनेक्शन देण्यासाठी अधिक पोलची आवश्यकता आहे किंवा शेतीपंपाला वीज देण्यासाठी जवळपास लाईन नाही, अशा ठिकाणी व गरजेनुसार सोलर यंत्रणा बसविण्याची योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. यासाठी शेतकºयांकडून अर्ज मागविण्यात आले होते. जिल्हाभरातून ४ हजार ४९६ शेतकºयांनी अर्ज केले होते. यातून २७८७ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये क्षेत्र चुकीचे असणे, गटनंबर चुकीचा टाकणे, १०० मीटरपेक्षा अधिक खोलीचा बोअर असणे, अतिशोषित (पाणी उपसा बंद असलेला भाग) सामाईक क्षेत्र असलेल्यांनी संमतीपत्र दिले नाही, असे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. पात्र असलेल्यांपैकी ५४५ शेतकºयांना कोटेशनपत्र दिले होते. 

पत्र दिलेल्यांमधील ३११ शेतकºयांनी प्रत्यक्षात पैसे भरले असल्याचे महावितरण कार्यालयातून सांगण्यात आले. उर्वरित पात्र शेतकºयांनाही शेतकरी हिस्सा भरण्यासाठी पत्र दिले जाणार असून, जे शेतकरी पैसे भरतील त्यांना सोलर कृषी पंप बसवून दिला जाईल. तीन एचपीसाठी साधारण १८ हजार व ५ एचपीसाठी साधारण २६ हजार रुपये शेतकºयांनी भरावयाचे असून, सोलरसाठीचा संपूर्ण खर्च वीज महामंडळ करणार आहे.

३९ सोलरपंप बसविले- मागील वर्षीपासून जिल्ह्यात सौरवर चालणारे शेतीपंप बसविण्याचे काम सुरू आहे. अटल सोलर कृषी पंप योजनेतून मागील वर्षभरात ३९ शेतीपंप बसविले असल्याचे महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी सांगितले. नव्याने अर्ज करणाºयांना व ज्या ठिकाणी शेतीपंपाला वीज देण्यासाठी यंत्रणा नाही, अशा ठिकाणी सोलर कनेक्शन दिले जात असल्याचे पडळकर यांनी सांगितले. 

ज्या ठिकाणी वीज कनेक्शन देण्यासाठी अडचणीचे आहे, अशा ठिकाणी सोलर कनेक्शन दिले जाणार आहे. तीन व पाच हॉर्सपॉवरचे पंप बसविले जाणार आहेत. यासाठी शेतकरी हिस्सा भरलेल्यांना कनेक्शन देण्याचे काम सुरू आहे. पात्र असलेल्यांकडून पैसे भरून घेऊन कनेक्शन दिले जाणार आहेत.- ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, महावितरण

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणagricultureशेतीFarmerशेतकरीPower Shutdownभारनियमन