- विलास जळकोटकर
सोलापूर - पांडुरंगाच्या भेटीसाठी दर मजल करीत पायी चालणारे वृद्ध वारकरी पंढरपुरात पोहचल्यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटाकडे पायऱ्या उतरत असताना तोल जाऊन पडल्याने जखमी झाले. पुंडलिक घाटावर रविवारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. बालाजी रामराव घोरवाड (वय- ६०, रा. लाद खुर्द, ता. कंधार, जि. नांडेड) असे या वारकऱ्याचे नाव आहे.
यातील बालाजी घोरवाड हे आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुराकडे पायी वारी करण्यासाठी चालत पंढरपुराकडे येत होते. दर मजल करीत रविवारी ते पंढरपुरात पोहचले. चंद्रभागेच्या पात्रात अंघोळ करण्यासाठी ते त्यांच्या सोबत्यांसममवेत कुंडलिक घाटाच्या पायऱ्या पार करीत असताना तोल गेल्याने ते खाली पडले. यामुळे त्यांच्या उजव्या पायाला मार लागला. प्रथमोपचारासाठी त्यांना पंढरपूरच्या सरकार दवाखान्यात उपचार करुन सोलापूरला शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.