सोलापूर : तहानलेला हद्दवाढ भाग.. रणरणते ऊऩ़़ हातामध्ये भांडे घेऊन धावणारी लहान मुले़.. इतक्यात टँकर येतो़.. महिलांची गर्दी होते़..पाण्यासाठी गोंधळ उडतो.. तुझे भांडे, माझी घागर वादविवाद होतो़.. पाहता पाहता २५ मिनिटांत टँकर खाली होतो़..झोप उडवून दिलेल्यांना दिलासा मिळतो.
हे दृश्य आहे हद्दवाढ भागातील माधव नगरमधील़ माधव नगरप्रमाणेच इतर नगरांची अवस्था शुक्रवारी निदर्शनास आली़ जिकडे तिकडे टँकर रस्त्यात दिसताच त्यामागे ‘टँकर आला़़़ पळा, पळा’ अशी ओरडत धावणारी मुले दिसली़ दुपारी अडीच वाजता दहा हजार लिटरचा टँकर या नगरात आला़ तो पोशम्मा देवी मंदिरासमोर थांबताच अवतीभोवती प्लास्टिक बॅरेल, घागरी, हंडे टाकी घेऊन महिलांनी गर्दी केली़ रांगेत आणि समान पाणी घेण्यावरुन एकमेकात वाद-विवाद सुरु झाला.
लहान मुले लहान भांडी, बकेटमध्ये भरलेले पाणी घेऊन घराकडे धावत़ पुन्हा हातातील भांडे घेऊन टँकरकडे धावणारे दृश्य होते़ पाणी घेण्यात बरेच पाणी खाली वाहून जाते़ या तीनही केंद्रावर पाच हजार लिटर आणि दहा हजार लिटर अशा दोन प्रकारातले टँकर भाडे तत्त्वावर लावले गेले आहेत़ छोट्या नगरात आणि वस्त्यांमध्ये पाच हजार लिटर तर जास्त लोकसंख्येच्या नगरात दहा हजार लिटरच्या टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.
पाणी उपसा केंद्रावरही अशी धांदल अधिकारी आणि कर्मचाºयांमध्ये दिसून येते़ अधिकाºयांच्या सूचना फोनवरुन यायच्या आणि त्या सूचनांनुसार संबंधित नगरात टँकर भरुन पाठवण्यासाठी कर्मचाºयांची उडालेली धांदल पाहायला मिळाली.
दोन दिवसात टँकरच्या खेपा डबल- रुपाभवानी चौकातील पाणी गिरणी, गुरुनानक चौकातील साधू वास्वानी केंद्र आणि जुळे सोलापूर पाणी टाकी या तीन केंद्रावरुन सध्या शहराला पाणीपुरवठा होतोय. या तीनही केंद्रावरुन दोन दिवसात टँकरच्या खेपा वाढल्या आहेत. पाणी गिरणी येथून शुक्रवारी ४४ टँकर पाणीपुरवठा झाला़ दोन दिवसात या केंद्रावर १५ ते २० टँकर खेपा अधिक झाल्या़ तसेच साधू वास्वानी केंद्रातून दोन दिवसापूर्वी सहा टँकरने पाणीपुरवठा झाला होता़ शुक्रवारी टँकरची संख्या ही १२ वर पोहोचली़ अशीच स्थिती जुळे सोलापुरातील केंद्रावर होती़
बॅरल २० रुपये तर जार ४० रुपये - ज्या भागात पाण्याचा सर्वाधिक तुटवडा आहे अशा भागात खासगीमध्ये पाणी विक्रीही जोरात सुरु आहे. माधव नगर आणि अशोक चौक परिसरात खासगीमध्ये काही बोअरधारक ांनी २० रुपये बॅरल पाणी विक्री सुरु केली आहे़ तसेच जारने पाणी पुरवठादेखील वाढला आहे़ चौका-चौकातून पाण्याचे जार घेऊन जाणारे रिक्षा दिसताहेत़ जारमधील पाणी ४० रुपयांनी पुरवठा होतोय़