शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
3
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
4
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
5
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
6
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
7
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
8
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
9
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
10
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
12
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
13
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
14
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
15
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
16
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
17
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
18
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
19
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
20
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!

सोलापुरात पाणी फाउंडेशनच्या कामाचं ‘तुफान आलंया..’

By admin | Published: April 13, 2017 2:38 PM

.

आॅनलाइन लोकमत सोलापूरअरुण बारसकर - सोलापूरआमच्या गावाला विशेष अशी ओळखच नव्हती, आम्ही राळेरासचे़़़ असे सांगितल्यानंतर बार्शी तालुक्यातील का?, असे लोक विचारायचे, आता आमच्या गावाला आमीर खानने श्रमदान केलेले राळेरास, अशी नवी ओळख निर्माण झाल्याची भावना युवा वर्गाने व्यक्त करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. यावर आमीर खानने हात जोडून गावकऱ्यांचे आभार मानले.पानी फाउंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेत भाग घेतलेल्या राळेरास येथे ग्रामसभेत आमीर खान यांनी संवाद साधताना गावकऱ्यांनी या भावना व्यक्त केल्या. सत्यमेव जयते पानी फाउंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेसाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील ३० गावांनी भाग घेतला असून, यापैकी राळेरास गावात सुरू असलेल्या श्रमदानात आमीर खान, त्यांच्या पत्नी किरण राव, पानी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, डॉ. सत्यजित भटकळ, वेळू गावचे सुखदेव भोसले, उत्तरच्या उपसभापती रजनी भडकुंबे, संभाजी भडकुंबे, गटविकास अधिकारी महादेव बेळ्ळे आदींसह पाणी फाउंडेशन सदस्य व गावकरी उपस्थित होते. आमीर खान यांनी ग्रामस्थांना ४० लोकांच्या सततच्या श्रमदानातून अजिंक्यतारा भागाचे पाण्याचे चित्र बदलले, तुमच्या-आमच्या दोन हाताच्या श्रमदानातून पुढील पाच-सहा वर्षांत संपृूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त व पाणीदार होईल, हे राळेरास ग्रामस्थांच्या आत्मविश्वासातूनच दिसत असल्याचे प्रतिपादन सिनेअभिनेते व पानी फाउंडेशनचे आमीर खान यांनी केले. ग्रामसभेचा समारोप करताना दंगल चित्रपटातील कल सुबह पाच बजे आना या डायलॉगची आठवण करुन देत गावकऱ्यांना सकाळी पाच वाजता श्रमदानासाठी येण्याचे आवाहन केले. यावेळी ग्रामसेविका माधुरी सुरवसे, फाउंडेशनच्या तृप्ती शिंदे, सचिन सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच नंदिनी माने, उपसरपंच सीताराम साबळे, कैलास नागवडे, शाहीर डांगे, सचिन सूर्यवंशी, विमल माने, संगीता डांगे, नागनाथ मानेंसह ग्रामस्थ, महिला व बालक उपस्थित होते.--------------------------- आमीर खान व किरण राव यांनी वृक्षारोपणासाठीचा खड्डा तसेच शोषखड्डे खोदणे व भरण्यासाठी श्रमदान केले.पाणी नक्की मिळेल : किरण राव- यावेळी आमीर खान यांच्या पत्नी किरण राव यांनी आपल्या गावातून चांगली वागणूक व प्रेम मिळाले, एकत्र येऊन पाणलोटचे काम करताहेत हे चांगले आहे, तुम्हाला पाणी नक्की मिळेल, कपही जिंकाल, असा संवाद साधला.- हे काम खूप मोठे आहे, जे तुम्ही आज करीत आहात, गावाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही परंतु गरिबांच्या हाताचे काम संपूर्ण महाराष्ट्र पाहील व राज्याला प्रेरणा मिळेल, असे पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांनी सांगितले. - मी पानी फाउंडेशनचे प्रशिक्षण घेतल्यानंतर झपाटल्यागत कामाला लागलो, मिलिटरीतला असल्याने गुडघ्यात मेंदू आहे असे लोक म्हणायचे,वेड्यात काढायचे, मात्र गावात काम झाल्यानंतर १० वर्षे सुरु असलेला टँकर बंद झाला, आज म्हणूनच मी तुमच्यासमोर उभा आहे, वेडेच लोक इतिहास घडवितात असे मागील वर्षी राज्यात प्रथम आलेल्या वेळू गावचे सुखदेव भोसले यांनी सांगितले.- तालुक्यातील प्रशिक्षण घेतलेल्या ३० गावांपैकी १२ गावांत मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून उर्वरित गावांतही कामे सुरू होतील व वॉटर कप जिंकण्यापर्यंत काम करतील, असा विश्वास गटविकास अधिकारी महादेव बेळ्ळे यांनी व्यक्त केला.