- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर विमानतळावर भाजपाचे पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांनी स्वागत केले. स्वागतानंतर फडणवीस यांनी भाजप पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. शिवाय प्रशासनातील अधिकारी यांच्याशी संवाद साधून अनेक प्रलंबित कामे मार्गा लावण्याच्या सुचना केल्या.
दरम्यान, मंगळवारी सकाळच्या सुमारास देवेंद्र फडणवीस हे कर्नाटकातील प्रचाराला जाण्यासाठी सोलापुरात आले होते. त्यानंतर ते वाहनाने कर्नाटकातील इंडीकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत कर्नाटकातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते. सोलापूर विमानतळावरील स्वागतावेळी खा. जयसिध्देश्वर महास्वामी, महापालिका आयुक्त शितल तेली-उगले, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी, मनिषा आव्हाळे, भाजपाचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अविनाश महागांवकर आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, विमानतळावर फडणवीस यांनी भाजपाचे पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी पदाधिकारी यांच्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या. याशिवाय विविध मागण्यांचे निवेदनही फडणवीस यांनी स्वीकारले. त्यानंतर प्रशासनातील अधिकारी यांच्याशी चर्चा करून प्रलंबित कामे सोडविण्याच्या सुचना केल्याचे सांगण्यात आले.