- दीपक दुपारगुडे सोलापूर : पाच लाखांसाठी पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत भाग्यलक्ष्मी ऊर्फ देविका दिनेश चिंता (वय २५, रा. पोला वाडा, गवई पेठ जुना बोरामणी नाका) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी देविका यांचे दिनेश याच्यासोबत विवाह झाला. विवाहानंतर आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला त्रास देणे सुरू केले. शिवाय माहेरून पंधरा तोळे सोने व पाच लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत जाचहाट सुरू केला. शिवाय त्यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला, अशा आशयाची फिर्याद देविका चिंता यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पती दिनेश चिंता, सासरा अंबादास चिंता, दीर दीपक चिंता, जाऊ चेतना चिंता (सर्व रा. गांधीनगर, अक्कलकोट रोड) व नणंद लीना गड्डम, विलास गड्डम (रा. मीरा रोड, मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस हवालदार कांबळे करीत आहेत.