सोलापूर : दिव्यांग लाभार्थींना झेरॉक्स मशीनऐवजी पिठाची चक्की देण्याचा निर्णय झेडपीच्या समाजकल्याण समितीच्या सभेत गुरुवारी घेण्यात आला.
समाजकल्याण समितीची सभा सभापती शीला शिवशरण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला समितीचे सदस्य अंजनादेवी पाटील, शिवाजी सोनवणे, अतुल खरात, साक्षी सोरटे, अण्णाराव बाराचारे, प्रभावती पाटील, रेखा गायकवाड, सुनंदा फुले, संगीता धांडोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत उपस्थित होते. प्रारंभी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांनी समाजकल्याण विभागातर्फे राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती दिली. दिव्यांगांना उपजीविकेसाठी झेरॉक्स मशीन दिले जाते. पण अलीकडे असे मशीन सगळीकडे उपलब्ध असल्याने व्यवसाय होत नाही. त्यामुळे झेरॉक्स मशीनऐवजी पिठाची चक्की देण्यात यावी अशी मागणी होत असल्याचे सदस्यांनी निदर्शनाला आले.
चर्चेअंती दिव्यांगांना पिठाची चक्की देण्याचा निर्णय घेण्यात आला. सन २०१९-२० या वर्षासाठी शाळेत जाणाºया मुलांना सायकल देण्याची योजना कायम ठेवण्यात आली. बारावी व पदवीधर शिक्षण घेणाºयांसाठी संगणकावरील टॅलीचा कोर्स सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले. दिव्यांग व गरिबांसाठी शेळीगट योजना (चार शेळ्या व एक बोकड) राबविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
मागासवर्गीय शेतकºयांना कृषीपंपच्मागासवर्गीय लाभधारकांसाठी इतर योजना राबविण्यावरही यावेळी चर्चा झाली. जिल्ह्यातील लाभधारकांसाठी नावीन्यपूर्ण योजनेतून विविध साहित्य उपलब्ध करून देण्याचे यावेळी ठरविण्यात आले. यामध्ये वाहन परवाना, टपरी, शेतकºयांसाठी कडबाकुट्टी मशीन, ठिबक संच, वीज पंप या योजना राबविण्यात येणार आहेत. वैयक्तिक लाभाच्या योजनेतून मागासवर्गीय शेतकºयांना पाच एचपी पंप व कडबाकुट्टी मशीन देण्यात येणार आहे.