आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २० : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात वसतिगृहांच्या घोटाळ्याचा सोक्षमोक्ष लागला नसतानाच आता व्यक्तिगत लाभाच्या योजनांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप सदस्य उमेश पाटील यांनी केला आहे. गेल्या पाच वर्षात समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या वस्तू, त्याचे ठेकेदार, लाभार्थ्यांची नावे आदींची माहिती त्यांनी मागितली आहे. समाजकल्याण विभागाच्या गेल्या काही बैठकांमध्ये शिल्लक साहित्याचा पुरवठा तातडीने करण्याच्या सूचना केल्या जात आहेत. त्याचवेळी अनेक लोक विद्यमान पदाधिकाºयांना भेटून मंजूर झालेले साहित्य आम्हाला मिळालेलेच नाही, अशा तक्रारी करीत आहेत. यादरम्यानच उमेश पाटील म्हणाले की, व्यक्तिगत लाभाच्या योजनांमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. मूळ लाभार्थी मदतीपासून वंचित आहेत. इतरांनाच लाभ झाल्याचे लक्षात येत आहे. याची तपासणी करण्यासाठी समिती नेमण्याची आवश्यकता आहे. पुढील आठवड्यात होणाºया सर्वसाधारण सभेतही हा मुद्दा उपस्थित करणार आहे. --------------------------वसतिगृहांचा अहवाल जिल्हाधिकाºयांना सादरच्समाजकल्याण आयुक्तांनी ५८ बोगस वसतिगृहांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना दिले होते. जिल्हाधिकाºयांनी तहसीलदारांच्या माध्यमातून या वसतिगृहांची तपासणी केली आहे. या तपासणीचा अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आला आहे. तो लवकरच समाजकल्याण आयुक्तांना पाठविण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सोलापूर जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या साहित्य वाटपात घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:46 AM
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात वसतिगृहांच्या घोटाळ्याचा सोक्षमोक्ष लागला नसतानाच आता व्यक्तिगत लाभाच्या योजनांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप सदस्य उमेश पाटील यांनी केला आहे.
ठळक मुद्दे शिल्लक साहित्याचा पुरवठा तातडीने करण्याच्या सूचनाव्यक्तिगत लाभाच्या योजनांमध्ये मोठा घोटाळा झालावसतिगृहांचा अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर