आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १८ : स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण करणाºया जिल्हा परिषदेने आता प्रधानमंत्री आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीकडे लक्ष वळविले आहे. २०१६-१७ मधील लाभार्थ्यांची घरकूल बांधणी २५ डिसेंबरपर्यंत पूर्ण व्हावी आणि २०१७-१८ मधील सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर कामाचा पहिला हप्ता जमा व्हावा यासाठी मुख्य कार्यकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी ग्रामीण विकास यंत्रणा आणि बांधकाम विभागातील अधिकाºयांसोबत बैठकांचा जोर लावला आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्यांनी या कामांना सहकार्य करण्याची सूचना अध्यक्ष संजय शिंदे यांनी केली आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निश्चित केलेल्या बेसलाईन सर्व्हेनुसार जिल्हा परिषदेने शौचालयांच्या बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण केले. हा राज्यातील विक्रम ठरला. त्यांचे केंद्र सरकारच्या पातळीवर कौतुकही झाले. पंतप्रधान आवास योजनेमध्ये पुरस्कार पटकावण्यासाठी डिसेंबरअखेर मागील कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. घरकूल बांधणीच्या कामात ग्रामसेवकांपासून पंचायत समितीपर्यंत यंत्रणा महत्त्वाची असते. पाठपुरावा केल्याशिवाय ही यंत्रणा काम करीत नाही. जिल्हा परिषदेला दरवर्षी हे काम पूर्ण करुन घेताना नाकीनऊ येतात, मात्र सध्या सर्वच यंत्रणेला प्रत्येक टप्प्यावर कामाचे उद्दिष्ट निश्चित करुन देण्यात आले आहे. सीईओ डॉ. भारुड यांनी शनिवारी शाखा अभियंता, सर्व विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ अभियंता यांची बैठक घेऊन २५ डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. रविवारीही काही अधिकाºयांसोबत बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला. घरकुलांच्या कामाबाबत पंचायत समित्यांच्या पातळीवर नेमके काय होत आहे याचा आढावाही घेतला जात आहे. -----------------------झेडपीने निश्चित केलेले उद्दिष्ट २०१६-१७ मध्ये जिल्हा परिषदेने ९४५४ घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित केले होते. यातील ३४०० घरकुलांचे काम नोव्हेंबरअखेर पूर्ण झालेले आहे. उर्वरित ६००४ पैकी ५ हजार घरकुलांचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम २५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची जबाबदारी डीआरडीए आणि बांधकाम विभागावर सोपविली आहे. २०१७-१८ साठी ५२७८ घरकुलांचे उद्दिष्ट आहे. या सर्व लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्याबरोबरच त्यांना २५ डिसेंबरपर्यंत पहिला हप्ता देण्याचे आदेश डॉ. भारुड यांनी यंत्रणांना दिले आहेत. ------------------घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणी आहेत. यात वाळू हा महत्त्वाचा मुद्दा आहे. वाळू मिळत नसल्याने काम पूर्ण करण्यात अडचणी येत असल्याचे ग्रामसेवक सांगत आहेत. यासाठी आम्ही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन विनंती केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी लक्ष घातल्यामुळे यात मार्ग निघेल. उद्दिष्ट वेळेवर पूर्ण होईल. - अनिलकुमार नवाळे, प्रकल्प संचालक, ग्रामीण विकास यंत्रणा. --------------------घरकूल कामाच्या प्रत्येक टप्प्यावरील कामाबाबत आम्ही लक्ष ठेवून आहोत. २०१६-१७ मधील सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान पोहोचलेच पाहिजे. जे लोक काम करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होणार आहे. २५ डिसेंबरपर्यंत ठरवून दिलेली कामे होणार आहेत़ केवळ नामांकनासाठी नाही तर १०० टक्के लाभार्थ्यांना वेळेवर लाभ मिळावा यासाठी हा प्रयत्न आहे. - डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
सोलापूर जिल्हा परिषदेचा आता ‘मिशन घरकूल’ बांधकाम विभागात बैठकांचा जोर वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 11:39 AM
स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण करणाºया जिल्हा परिषदेने आता प्रधानमंत्री आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीकडे लक्ष वळविले आहे.
ठळक मुद्देबेसलाईन सर्व्हेनुसार जिल्हा परिषदेने शौचालयांच्या बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण२०१६-१७ मध्ये जिल्हा परिषदेने ९४५४ घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित केले२५ डिसेंबरपर्यंत पहिला हप्ता देण्याचे आदेश डॉ. भारुड यांनी यंत्रणांना दिले