आप्पासाहेब पाटील । सोलापूर : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नवीन पिढी व्यसनाधीन होऊ लागली आहे़ ही व्यसनाधीन होऊ लागलेली पिढी थांबविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसह युवक वर्गाने तालमीत व्यायाम करण्यासाठी जनजागृती, प्रचार, प्रसार करण्यात येत आहे़ दरम्यान, निर्व्यसनी व निरोगी युवक घडविण्यासाठी श्रीकृष्ण तालीम केंद्राच्या वतीने अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत़ परिणामी युवकांना हव्या असलेल्या सेवासुविधा पुरविण्याबरोबर इनडोअर, मॅट आदी सुविधा देण्यात आल्या आहेत.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सन २०१४ मध्ये गुरूवर्य हरिश्चंद्र बिराजदार (मामा), तुकाराम लकडे (वस्ताद) यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण कुस्ती केंद्राची स्थापना करण्यात आली़ संस्थेचे मार्गदर्शन किसन मेकाले (गुरुजी) यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत या तालमीमधील मल्ल हे उपमहाराष्ट्र केसरी, हिंद केसरी सुवर्णपदक, माजी इंडियन नेवी आॅफिसर, एऩटी़एस. कोच तयार झाले़ सध्या तालमीत वस्ताद राजा देशपांडे, भैरवनाथ गायकवाड, खंडू सदाफुले, केदारनाथ स्वामी, राष्ट्रीय खेळाडू सनी देवकते यांच्या सहकार्याने तालमीत शेकडो मुले रोज माती, गादी, मॅट, अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने अद्ययावत असलेल्या जिमद्वारे व्यायाम करतात़ या तालमीत सराव करणाºया मल्लांनी आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये होणाºया यात्रेनिमित्तच्या कुस्ती स्पर्धेसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रात श्रीकृष्ण कुस्ती केंद्राचा नावलौकिक केले आहे.
या तालमीत आतापर्यंत बाळासाहेब सपाटे, किरण जाधव, विकास धोत्रे, बालाजी यलगुंडे, बाबासाहेब चव्हाण, रुषीकेश आलसिंग, स्वप्निल पाटील, किरण कदम, समाधान पाटील, अक्षय धानोरे, सचिन जाधव, युवराज टिळे, निलेश ठेंगल, लक्ष्मण बिराजदार, राहुल हेगडे, आकाश पुजारी, पैलवान स्नेहा कदम, पै़ नरसिंग, पै़ साईदीप, अकबर फजल यांनी राष्ट्रीय पातळीवर तालमीचा नावलौकिक केला आहे.
भविष्यात श्रीकृष्ण तालीम केंद्रात अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह कुस्ती इनडोअर हॉलमध्ये करण्याचे नियोजन आहे़ याशिवाय शहर, जिल्हा व राज्य पातळीवरील कुस्ती स्पर्धा घेण्याचा मानस आहे़ भविष्यातील पिढी निर्व्यसनी व निरोगी राहण्यासाठी श्रीकृष्ण तालीम केंद्राच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहे़ अधिकाधिक मुले कशा पध्दतीने तालमीच्या व्यायामाकडे वळतील, यासाठी यापुढे प्रयत्न असणार आहेत.
- भरत मेकाले, श्रीकृष्ण तालीम केंद्र, सोलापूर
यांनी गाजविले राज्यातील आखाडे...याशिवाय राजेंद्र राजमाने (भगवंत केसरी), समाधान पाटील (मुंबई महापौर केसरी), विलास वहिपुडे (औरंगाबाद केसरी), किरण कदम (त्रिमूर्ती केसरी), विजय माने (कामगार केसरी), पैलवान नरसिंह (हैदराबाद केसरी), अकबर फैजल (तेलंगणा केसरी), योगेश पवार (उपमहाराष्ट्र केसरी व उत्तर महाराष्ट्र केसरी), विकास धोत्रे, बाळू सपाटे, सुंदर जवळगे, किरण जाधव, अंगद बुलबुले, शंकर साठे, नंदकुमार काकडे, श्रीकांत कांबळे यांनी युवक चषक केसरी स्पर्धा गाजविल्या आहेत़ याशिवाय रविराज सरवदे, राणू दोरकर, राजेंद्र राजमाने, समाधान पाटील, विलास दहिपुडे, विलास दहिपुडे, बाळू सपाटे, किरण कदम, राहुल हेगडे, किरण जाधव, नंदकुमार काकडे, बाळासाहेब चव्हाण, बालाजी भुरुंगे, सचिन पाटील, अंगद बुलबुले, रुषीकेश भालसिंग, रामसिंग रजपूत, विकास धोत्रे, आकाश पुजारी आदींनी तालमीचे नाव राज्यभर करून लौकिक केला़