महेश कुलकर्णी सोलापूर : टेक्स्टाईल उद्योगाला १५ वर्षांपूर्वीचा सुवर्णकाळ प्राप्त व्हावा, म्हणून टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे व्हायब्रंट टेरी टॉवेलच्या माध्यमातून युरोप आणि आखातात मार्केटिंग सुरू केले आहे. येथेही लढाई पाकिस्तानशी असून, पाकमध्ये उत्पादित होणाºया टॉवेलला टक्कर देण्यासाठी सोलापुरातील उत्पादकांनी सहा देशांत रोड शो आयोजित करून सोलापुरी टॉवेलचे ब्रँडिंग केले आहे.
सोलापुरात २५ ते २७ सप्टेंबर या दरम्यान ‘व्हायब्रंट टेरी टॉवेल ग्लोबल एक्स्पो समिट २०१९’ या आंतरराष्टÑीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाद्वारे टेरी टॉवेलचे जगभरात मार्केटिंग करण्यात येणार आहे. विशेषत: युरोप आणि आखातातील पारंपरिक बाजारपेठ ही सोलापूरच्या उत्पादनांनी पुन्हा काबीज करण्यासाठी टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. या अंतर्गत १५ ते २५ फेब्रुवारीदरम्यान सहा देशांत सोलापुरी टॉवेलच्या ब्रँडिंगसाठी ‘रोड शो’ आयोजित करण्यात आले होते.युरोपातील इंग्लंड, जर्मनी आणि फ्रान्स या देशात १६ ते २० फेब्रुवारीदरम्यान रोड शो आयोजित करण्यात आले होते.
यावेळी एक छोटेखानी चर्चासत्रही घेण्यात आले. सोलापुरी टॉवेलच्या उत्पादनांचा दर्जा, किफायतशीर किंमत आणि वेळेवर मालाची निर्यात याबद्दल टीडीएफचे अध्यक्ष राजेश गोसकी, व्हायब्रंट टेरी टॉवेलचे प्रमुख सिद्धेश्वर गड्डम, दत्तू दुबास यांनी परदेशी व्यापाºयांना माहिती दिली.
आखाती देशातील संयुक्त अरब अमिराती, ओमान आणि कतार या देशांत टीडीएफचे वेणुगोपाल अल्ली, संजय मडूर यांनी व्यापाºयांना माहिती दिली. हे सहाही देश टेरी टॉवेल मालाची मोठे खरेदीदार असून, यापूर्वी सोलापुरातील बहुतांश उत्पादित माल येथे निर्यात होत होता.
निर्यातीवर सवलत हवी - गोसकी- सोलापुरातून परदेशात निर्यात करण्यात येणाºया टॉवेलवर ८ ते १० टक्के निर्यातकर लागतो. हाच माल पाकिस्तानमधून मागविल्यास युरोपमधील व्यापाºयांना ० टक्के ड्यूटी भरावी लागते. आपल्या टॉवेलचा दर्जा चांगला असूनही निर्यातीत सवलत आणि ब्रँडिंगमुळे आपण मागे राहिलो आहोत. आता नव्याने सुरू केलेल्या मार्केटिंगमुळे आपण पाकिस्तान आणि इतर देशांच्या पुढे जाऊ, असे टीडीएफचे अध्यक्ष राजेश गोसकी यांनी सांगितले.
जर्मनीत वाव४सोलापूरमध्ये उत्पादित होणाºया टॉवेलला जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. वीस वर्षांपूर्वी सोलापुरात तयार होणारे ९० टक्के टॉवेल युरोपमधील प्रमुख देशात निर्यात करण्यात येत होते. येथील टेक्स्टाईल उद्योगात तयार होणारा संपूर्ण माल एकट्या जर्मनीला निर्यात करता येण्याजोगा आहे.
कनेक्टिव्हिटीची अडचण४टॉवेलच्या मार्केटिंगसाठी येत्या सप्टेंबर महिन्यात आंतरराष्टÑीय पातळीवरील प्रदर्शन सोलापुरात भरविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर देशोदेशीच्या व्यापाºयांना येथे निमंत्रण दिलेले असले तरी मुख्य अडचण ही विमानसेवेची आहे. सोलापुरात विमानसेवा नसल्याने मोटारीने प्रवास करून व्यापारी येण्यास तयार नसल्याने याविषयी मार्ग काढणे आवश्यक आहे, असे टीडीएफचे श्रीनिवास बुरा यांनी सांगितले.