सोलापूर : आमच्या व्यवसायाकरिता लागणारे टॉवेल आम्ही नेहमी एखाद्या एजंटाच्या सल्ल्यानुसार घ्यायचो. टेरीटॉवेल प्रदर्शनाला आल्यानंतर यातही इतके सारे पर्याय असतात हे कळाले. यामुळे यापुढे टॉवेल खरेदीसाठी सोलापूर हा आमच्याकडे सर्वात चांगला पर्याय आहे, अशी प्रतिक्रिया प्रदर्शनाला भेट देणाºया परदेशी नागरिकांनी दिली.
होटगी रोड येथील काडादी सांस्कृतिक भवनमध्ये व्हायब्रंट टेरीटॉवेल प्रदर्शन सुरु आहे. या दोन दिवसांत सुमारे १०० परदेशी नागरिकांनी या प्रदर्शनास भेट दिली. येथे असणाºया विविध प्रकारच्या टॉवेलचे कौतुक करताना सोलापूर भविष्यात या क्षेत्रात मोठी प्रगती करेल, असा विश्वास या परदेशी नागरिकांना दिला. हॉटेल, रुग्णालय आदींसाठी टॉवेलची गरज पडत असते. आता टॉवेल हा फक्त टॉवेलच न राहता त्याचा बहुपयोग करता येतो. विविध प्रकारचे टॉवेल, त्यांची रंगसंगती ही अनेकांची डोळे दिपवणारी आहे. या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर खूूप नव्या कल्पना जाणून घेता आल्या. यापूर्वी टॉवेल खरेदीसाठी कारखान्यांना भेटी दिल्या. मात्र पहिल्यांदाच अशा प्रकारचे प्रदर्शन पाहत असल्याचे चीनचे शानडाँग यांनी सांगितले.
या देशातील नागरिकांनी पाहिले प्रदर्शन- काडादी सांस्कृतिक भवनमध्ये व्हायब्रंट टेरीटॉवेल प्रदर्शन हे २७ सप्टेंबरपर्यंत सुरु असणार आहे. उद्घाटनापासून दोन दिवसात १०० हून अधिक परदेशी नागरिकांनी या प्रदर्शनास भेट दिली. या भेटीत व्यवसायासंबंधी चर्चाही करण्यात आल्या. दुबई, चीन, ओमान, कतार, श्रीलंका, अमेरिका, डेन्मार्क, जपान, जर्मनी, कॅनडा, आॅस्ट्रेलिया या देशातील व्यावसायिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे. प्रदर्शनाचा अणखी एक दिवस शिल्लक असल्याने शेवटच्या दिवशी आणखी लोक या प्रदर्शनाला भेट देतील, अशी अपेक्षा टेरीटॉवेल प्रदर्शनाचे अध्यक्ष राजेश गोसकी यांनी व्यक्त केली.
यापूर्वी तीनवेळा मी सोलापूरला भेट दिली आहे. टॉवेल व इतर वस्तूंची खरेदी देखील केली. दिवसेंदिवस येथे तयार होणाºया टॉवेलच्या गुणवत्तेत सुधारणा होत आहे. या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय दर्जाचे टॉवेल आहेत.- शानडाँग, चीनटॉवेलचे प्रदर्शन सोलापुरात भरविल्याने आम्हाला टॉवेल तर पाहता आलेच, सोबतच हे शहरही जाणून घेता आले. प्रत्यक्षात टॉवेलची निर्मिती कशी होते हे जाणून घेण्यासाठी मी सोलापुरात आले आहे. या प्रदर्शनात असलेल्या यंत्रांचीही माहिती घेतली.- अँडी लिया, चीन