महेश कुलकर्णी सोलापूर : थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी मद्यशौकिनांनी आठवडाभर आधीच तयारी केलेली असते. यावर्षी पहाटेपर्यंत परमिट रूम पहाटे पाचपर्यंत तर वाईन शॉप रात्री एक वाजेपर्यंत सुरू राहणार असल्यामुळे मद्यप्रेमींना पहाटेपर्यंत झिंग झिंग झिंगाट करता येणार आहे. दुसरीकडे इयरएंड साजरा करा, पण मद्यसेवन परवाना घ्यायचे विसरू नका. अशी प्रेमळ आणि कायदेवजा सल्ला उत्पादन शुल्क खात्याच्या वतीने तमाम सोलापुरी मद्यशौकिनांना देण्यात आला आहे.
राज्यभरात दरवर्षी ३१ डिसेंबर साजरा करणाºयांची संख्या लक्षणीय आहे. राज्य शासनाच्या वतीने ख्रिसमसपासून तीन दिवस रात्री उशिरापर्यंत वाईन शॉप आणि परमिट रुम सुरू ठेवण्याची परवानगी मिळते. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील उत्पादन शुल्क खात्याच्या वतीने देशी मद्यसेवनाचे एक लाख दहा हजार परवाने विविध मद्यविक्री दुकानांमध्ये वाटप करण्यात आले आहेत. तसेच देशी मद्यसेवनाचेही ६५ हजार परवाने वाटप करण्यात आले आहेत. मद्यपींनी थर्टीफर्स्ट जोरदार साजरा करावा, परंतु शासनाच्या नियमानुसार एकदिवसीय परवाना काढावा, असे आवाहन उत्पादन शुल्क खात्याकडून करण्यात आले आहे. एकदिवसीय परवाना मिळण्यासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची सुविधा असल्यामुळे आता तातडीने परवाना मिळतो. याबरोबरच शहरातील सर्व मद्यविक्री दुकानांमध्ये लाखापेक्षा अधिक परवाने वाटप करण्यात आले आहेत.
एका वाईन शॉपमध्ये एक हजार मद्यसेवन परवाने ठेवण्यात आलेले आहेत. तसेच देशी दारूचे दुकान आणि परमिट रुममध्ये एक लाख परवाने ठेवले आहेत. एका परवान्याची किंमत पाच रुपये आहे. शहर आणि जिल्ह्यात एकूण ८४६ मद्यविक्रीची दुकाने आहेत. या सर्व दुकानांतून थर्टीफर्स्टच्या रात्री मोठ्या प्रमाणावर मद्यविक्री होते.
पहाटेपर्यंत सुरू राहणाºया बारमध्ये होणाºया मद्यविक्रीतून शासनाला अधिकाधिक महसूल मिळण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून उत्पादन शुल्क खात्याकडून बनावट आणि बेकायदेशीरपणे बाहेरून आलेल्या मद्यावर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसात चार ठिकाणी छापे मारून बनावट मद्य जप्त करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क खात्याच्या वतीने देण्यात आली.
पाच पथकांद्वारे वॉच- बनावट, कस्टम ड्यूटी चुकवून आणलेले मद्य किंवा हातभट्टी छुप्या मार्गाने येऊ नये, यासाठी उत्पादन शुल्क खात्याच्या वतीने पाच पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. मंद्रुप, सांगोला, अकलूज, अक्कलकोट या ठिकाणी चेक पोस्ट तर भरारी पथकाच्या माध्यमातून शहरात लक्ष ठेवून आहे. एकूण ३५ कर्मचारी याकामी नेमण्यात आले आहेत.
वडकबाळजवळ हातभट्टी जप्त- दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ येथे शुक्रवारी उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाºयांनी कारवाई करून एक बोलेरो आणि १७ हजार लिटर रसायन जप्त केले आहे. या कारवाईत साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत परमिट रुम, बिअर शॉपीची दुकाने खुली असली तरी मद्यप्रेमींनी परमिट (पिण्याचे लायसन) घेतल्याशिवाय मद्यपान करू नये. याशिवाय कुठेही बनावट मद्य, हातभट्टी, शिंदी, रसायन आढळल्यास तातडीने उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाºयांशी संपर्क साधावा.- रवींद्र आवळेअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग