सोलापूर : कोरोनाचे आणखी 4 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली, सोमवारी सकाळी मिळालेल्या आवाजामध्ये सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आणि सायंकाळी चार रुग्णांची भर पडल्याने शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन मृतांसह सोलापुरात कोरोणा रुग्णांची संख्या 25 वर गेली आहे.
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सोमवारी सकाळी सांगितलेल्या माहितीमध्ये सहाजण कोरोना पॉझिटिव आढळले आहेत. त्यामधील दोघांना सारीचीही लागण झाली आहे. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये २ महिला आणि ४ पुरुषांचा समावेश आहे. यासोबत सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या २१ वर पोहोचली होती. यामध्ये बापूजी नगर मध्ये १, कुर्बान हुसेन नगर १, पाच्छापेठ २, जगन्नाथ नगर १, भद्रावती पेठ १ असे आढळलेले रुग्ण आहेत.
सध्या आयसोलेशनमध्ये असलेल्यांची संख्या 692 असून त्यापैकी 630 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून यात 605 जणांचा अहवाल निगेटिव्ह अाला आहे. आणखी 162 जणांचा अहवाल यायचा आहे
पाच्छापेठ, रविवार पेठ आणि ७० फूट रोडवरील इंदिरा नगर, अशी तीन ठिकाणे पोलिसांनी प्रतिबंधित म्हणून घोषित केली आहेत. आज त्यात आणखी वाढ झाली असून बापूजीनगर, कुर्बान हुसेननगर आणि हैदराबाद रस्त्यावरील आयोध्यानगर पोलिसांनी सील केले आहे.
वाढलेले रुग्ण बापूजी नगरातील एक, शेळगीतील आयोध्यानगर आणि कुर्बान हुसेन व पाच्छा पेठ येथील असल्याचेही ते म्हणाले. सोमवारी 67 जणांचे अहवाल आले त्यापैकी 10 पॉझिटिव्ह आहेत