शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
3
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
4
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
5
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
6
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
7
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
8
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
9
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
10
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
11
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
12
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
13
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
14
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
15
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
17
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
18
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
19
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

सोलापूरकरांनो विमानाने मुंबई, दिल्लीला जायचंय.. मग कर्नाटकचा रस्ता धरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:08 PM

उद्योजकांमध्ये नाराजी; सोलापूर आधी विजापुरात होतेय आंतरराष्ट्रीय विमानतळ

ठळक मुद्देसोलापूर हे राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जात होतेयेथे योग्य सेवा, सुविधा नसल्याने शहराचा म्हणावा तसा विकास झाला नाहीतसे पाहायला गेलो तर सोलापुरात विमानसेवा खूप आधीपासून सुरू व्हायला हवी होती

सोलापूर : शहरातून कमी वेळात मुंबई, दिल्लीला जायचंय...तर मग आधी विजयपूरला जावं लागेल. कारण सोलापूरच्या मागून विजापुरात आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होत आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात ९५ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, २०२२ मध्ये हे विमानतळ सुरु होणार आहे. सोलापुरातील उद्योगवाढीसाठी विमानतळ गरजेचे असताना ते होत नसल्याबद्दल उद्योजकांत नाराजी आहे.

उद्योजक तसेच इतरांच्या प्रयत्नामुळे किंगफिशरची विमानसेवा सुरू झाली. काही काळानंतर ही सेवा बंद झाली. केंद्र सरकारच्या उडान योजनेत सोलापूरचा तीनदा सहभाग झाला, पण प्रत्यक्षात विमानसेवा  सुरू झालीच नाही. साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा देखील आला. 

विमान उतरण्यासाठी व उड्डाण करण्यासाठी दोन्ही बाजू रिकाम्या असाव्या लागतात. नेमका हाच अडथळा येत असल्याचे विमानतळ सल्लागार समितीचे माजी सदस्य केतन शहा यांनी सांगितले.

विजापूर येथील विमानतळासाठी कर्नाटक शासनाने २२० कोटी रुपये मंजूर केले आहेत. विजापूर शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर मदभावी आणि बुºहाणपूर या परिसरात ७२७ एकर  जमीन हस्तांतरण करण्यात आली आहे. 

२०२२ मध्ये विमानतळ सुरू झाल्यास दुबई, मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरु, हैदराबाद, तिरुपती, चेन्नई या देशांतर्गत व परदेशातून विमानसेवा शक्य होईल. यामुळे सोलापूरकरांना आता स्वत:ची विमानसेवा ऐवजी विजापूरच्या विमानसेवेवर अवलंबून रहावे लागणार आहे.

होटगी रोडची सेवा असावीराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बैठक घेतली होती. सोलापूरच्या बोरामणी येथील विमानतळासाठी ५० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी पाच महिन्यांपूर्वी सांगितले होते. या विषयी मी चौकशी केली असता पैसे तर दूर राहिले त्या बैठकीचे मिनिटस्देखील कोणत्याच खात्याकडे नाहीत. बोरामणी येथे विमानतळ होईल तेव्हा होईल तोपर्यंत होटगी रोड विमानतळावरुन विमान सेवा चालू करायला हवी, असे विमानतळ सल्लागार समितीचे माजी सदस्य केतन शहा यांनी सांगितले.

सोलापूर हे राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जात होते. येथे योग्य सेवा, सुविधा नसल्याने शहराचा म्हणावा तसा विकास झाला नाही. तसे पाहायला गेलो तर सोलापुरात विमानसेवा खूप आधीपासून सुरू व्हायला हवी होती, पण तसे होताना दिसत नाही. यापुढे तरी लवकर विमानसेवा शहरात सुरू व्हावी, शहराची प्रगती व्हावी अशी अपेक्षा बाळगू या. - राजेश गोसकी, अध्यक्ष, टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन.

टॅग्स :Solapurसोलापूरbusinessव्यवसायKarnatakकर्नाटकAirportविमानतळ