सोलापूर : स्थानिक फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापुरी फूल बाजारात फुलांची आवक मुबलक आहे, दरही उतरले, मात्र होळीचा महिना असल्याने कोणी सण, उत्सव, विधी-सोहळे करीत नसल्याने सध्या बाजारपेठेवर मंदीचे सावट पसरले आहे़ फूलविक्रेत्यांना आता वेध लागले आहेत चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढी पाडव्याचे. पाडव्यानंतर विवाह सोहळे, उत्सव आणि समारंभांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन होत असल्यामुळे बाजारात तेजी येईल, असे व्यापाºयांनी सांगितले. पुढील महिन्यात लोकसभा निवडणुका होणार असल्यामुळेही फुलांचा चांगला उठाव असेल, असेही सांगण्यात आले.
दरवर्षी शिवरात्र ते पौर्णिमा यादरम्यानचा काळ हा वर्ज्य काळ मानला जातो. या काळात ना विवाह सोहळा, ना मुंज, ना कौटुंबिक कार्यक्रम़ होळीच्या महिन्यात काहीच कार्यक्रम घेतले जात नाहीत़; पण याच काळात विविध रंगी फुलांची आवकही मोठ्या प्रमाणावर होते. मागणीच नसल्यामुळे आता फूलबाजार थंडावला आहे़ या व्यापाºयांना सध्या वेध लागले आहेत चैत्र शुद्ध प्रतिपदेचे़ यानंतर लग्न सराई, विधी सोहळे, कार्यक्रम सुरु होतात़ यातच लोकसभेची निवडणूक आली आहे़ त्यामुळे चैत्र शुद्ध प्रतिपदेनंतर अर्थात २२ मार्चनंतर फूलबाजार जोरात चालणार आहे़ सध्या बाजारपेठेत मंद्रुप, कासेगाव, गुळवंची, कळमण, गंगेवाडी, उळे-कासेगाव आणि अक्कलकोट तालुक्यातून काही गावातून फुलांची आवक सुरू आहे़
दरवर्षी या महिन्यात शिवरात्र ते पौर्णिमेचा काळ हा वर्ज्य काळ म्हणून समजला जातो़ या क ाळात कोणतेही कार्यक्रम होत नाहीत़ कुठलेही विधी सोहळे होत नसल्याने फुलांची विक्री प्रचंड घसरली आहे़ कानडीत हा महिना तसा ‘बब्बी तिंगळा’ म्हणून संबोधला जातो़ बºयाच प्रमाणात फूलसाठा हा सायंकाळी टाकू न द्यावा लागतो किंवा मागेल त्या दरात ग्राहकाला देऊन बसणारा फटका कमी करण्याचा प्रयत्न करतो़- शंकर फुलारे फूल विक्रेता
सध्याचे दर आणि कंसात पूर्वीचे दर (किलो)
- - झेंडू - १० रुपये (५० रुपये)
- - गुलाब - ३० रुपये (१०० रुपये)
- - मोगरा - ४० रुपये (१५० रुपये)
- - गुलछडी - ६० रुपये(१०० रुपये)