सोलापूर : यंदाचा साखर हंगाम संपत आला असून, १९५ पैकी १९० कारखान्यांचा पट्टा पडला आहे.राज्यात ऊस गाळपात अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय असणाºया सोलापूर, अहमदनगर व कोल्हापूर जिल्ह्याचे संपूर्ण कारखाने बंद झाले आहेत. सोलापूर जिल्हा गाळपात प्रथम क्रमांकावर तर एक कोटी ३६ लाख १० हजार ९२३ मेट्रिक टन गाळप करून अहमदनगर जिल्हा दुसºया क्रमांकावर आहे. यंदा अहमदनगर जिल्ह्याने कोल्हापूरला मागे टाकून ही कामगिरी केली आहे.
यावर्षी एक नोव्हेंबरपासून राज्यातील साखर हंगाम सुरू झाला होता. जानेवारी महिन्यात राज्यात तब्बल १९५ साखर कारखान्यांचा हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होता. फेब्रुवारी महिन्याच्या दुसºया आठवड्यापासून एक-एक साखर कारखान्याचा पट्टा पडण्यास सुरुवात झाली. सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ३१ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. या साखर कारखान्यांनी राज्यात उच्चांकी एक कोटी ६० लाख ३७ हजार ९० मेट्रिक टन गाळप झाले.
सोलापूर जिल्ह्याचा गाळप हंगाम सुरु असेपर्यंत कोल्हापूर जिल्हा दुसºया तर अहमदनगर जिल्हा गाळपात तिसºया क्रमांकावर होता. मार्च महिन्याच्या दुसºया आठवड्यापर्यंत सोलापूरचे सर्वच कारखाने बंद झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांचा पट्टा मार्च महिन्यात पडण्यास सुरुवात झाली. मार्च ते एप्रिलच्या दुसºया आठवड्यात कोल्हापूरचे सर्व २२ कारखाने बंद झाले; मात्र अहमदनगरचे बहुतांशी साखर कारखाने मार्च महिन्यात पूर्ण क्षमतेने सुरू होते.
यामुळे गाळपात कोल्हापूरला मागे टाकत अहमदनगर जिल्हा पुढे आला. कोल्हापूर जिल्ह्याचे एकूण गाळप एक कोटी ३३ लाख ३७ हजार ६६२ मे.टन तर अहमदनगर जिल्ह्याचे गाळप एक कोटी ३६ लाख १०हजार ९२३ मेट्रिक टनावर थांबले आहे. यावर्षी गाळपात सोलापूर प्रथम, अहमदनगर द्वितीय तर कोल्हापूर जिल्हा तिसºया क्रमांकावर राहिला आहे. पुणे जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी एक कोटी १९ लाख ७३ हजार ६४६ मे.टन गाळप झाले असून दोन साखर कारखान्याचे गाळप सुरू असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.
कोल्हापूरच्या जवाहरचे उच्चांकी गाळप
- - कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर हा सहकारी साखर कारखाना १७ लाख ६३ हजार २३९ मे.टन गाळप करुन राज्यात प्रथम असून सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठलराव शिंदे हा कारखाना १७ लाख ४४ हजार १४९ मे.टन गाळप करून दुसºया क्रमांकावर राहिला आहे. अहमदनगरचा अंबालिका(इंडेकॉन) हा कारखाना १३ लाख ६४ हजार २१५ मे.टन गाळप करून तिसºया क्रमांकावर आहे. हे तिन्ही कारखाने बंद झाले आहेत. सातारच्या सह्याद्रीने १३ लाख १०० मे.टन गाळप केले आहे तर व हा कारखाना सुरू आहे.
- - राज्याचे आतापर्यंतचे गाळप ९५१.६४ मे.टन झाले असून १०७०.७४ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.