सोलापूर : कुठलेही नैसर्गिक संकट आले की प्रत्येकवेळी धावून येणारे सोलापूरकर. किल्लारीचा भूकंप असेल अथवा कारगिल युद्ध.. त्यावेळीही मदतीसाठी अनेकांचे हात सरसावले होते. आताही हेच हात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावल्याचे दिसून येते. सकल जैन समाज आणि लायन्स क्लब आॅफ सोलापूरने स्वतंत्रपणे मदतफेरी काढून पूरग्रस्तांविषयी आपल्यातली आपुलकी दाखवून दिली. शाळांमधील चिमुकल्यांनी खाऊचे पैसे पूरग्रस्तांना देऊन आपला वाढदिवस साजरा केला.
योगी नव्हे उपयोगी बनाचातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचनावेळी पूरग्रस्तांच्या विषयाला स्पर्श करुन पूज्य गौतममुनी आणि विनयमुनी यांनी सकल जैन समाजाला ‘योगी नव्हे तर उपयोगी बना’, असा सल्ला दिला होता. तोच कानमंत्र घेऊन सकल जैन समाजही मदतीसाठी पुढे सरसावला आहे. चातुर्मासासाठी विराजित पूज्य महावीर मुनीजी व वितराग दर्शिता श्रीजी यांच्या प्रेरणेने पूनम मित्रमंडळाच्या माध्यमातून शहरातील बाजारपेठांमधून मदतफेरी काढली. यावेळी दानशूररुपी व्यापारी, नागरिकांनी चटई, सतरंजी, चादर, ब्लँकेट, टॉवेल्स, बादल्या, डबे, झाडू, साड्या, धान्य, विविध प्रकारची औषधे, मास्क, हॅन्डग्लोज देऊन आपली पूरग्रस्तांविषयीची सेवा बजावली. सोमवारी एका ट्रकमधून हे साहित्य सांगलीकडे रवाना करण्यात आले.
सकल जैन समाजाच्या मदतीफेरीत कनुभाई शहा, कल्पेश मालू, प्रकाश संकलेचा, सुभाष लोणावत, हितेश कांकरिया, जितेंद्र आकरानी, हरीश शहा, प्रकाश सेठिया, दिलीप ओस्तवाल, नीलेश शहा, जितेंद्र शहा, मुकेश संगवी, जसराज कांकरिया, भद्रेश शहा, मनीष पोरवाल, राहुल जैन, आनंद चौधरी, प्रवीण भंसाली, प्रवीण वानिगोता, प्रवीण बाफना, नवरतन संकलेचा, विकास संघवी, पारस शहा आदी सहभागी झाले होते.
लायन्स क्लबच्या फेरीस प्रतिसादलायन्स क्लब आॅफ सोलापूरच्या वतीने सोमवारी सकाळी चार हुतात्म्यांना अभिवादन करुन मदतफेरीस सुरुवात करण्यात आली. तेथून ही मदतफेरी लकी चौक, नवी पेठ, दत्त चौक, जुनी फौजदार चावडी, टिळक चौक, फलटण गल्ली, चाटी गल्ली, मीठ गल्ली, कुंभारवेसमार्गे कोंतम चौकातील महात्मा बसवेश्वर पुतळ्याजवळ आली. तेथे महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यास अभिवादन करुन फेरीचा समारोप करण्यात आला.
यावेळी नागरिकांनी, व्यापाºयांनी कपडे, रोकड, चादरी, टॉवेल्स, धान्य, बनियन, पाण्याच्या बाटल्या आदी वस्तू देऊन पूरग्रस्तांना दिलासा दिला. मदतफेरीत अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे, मिडटाऊनचे अध्यक्ष महेश नळे, मेट्रोचे अध्यक्ष अशोक भांजे, रॉयलच्या अध्यक्ष उर्मिला खेरोडकर, टिष्ट्वन सिटीचे अध्यक्ष विश्वनाथ एन. स्वामी , राजेंद्र कांसवा, बाळासाहेब कुलकर्णी, संतोष काबरा, सोमशेखर भोगडे, महिबूब शेख, सुनील इंगळे, सुरेश जाजू, शैलेश पोरवाल, रंजना शहा-कांसवा, रंजना पाटील, गोविंद मंत्री आदी सामील झाले होते.
लोकशाहीवादी युवा संघाच्या मदतफेरीत अकरा हजार जमा- भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ जिल्हा समिती, सोलापूरच्या वतीने सोमवार, दिनांक १२ आॅगस्ट रोजी बकरी ईदचे औचित्य साधून शहरातील विविध ईदगाह मैदानाच्या ठिकाणी नमाज पठणानंतर सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर या ठिकाणच्या पूरग्रस्तांसाठी निधी संकलनाची मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत मुस्लीम बांधवांनी यथाशक्ती मदत करून ११,१८० रुपये निधी जमा करण्यात आला. हा निधी पूरग्रस्तांना पाठविण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी, जिल्हा सचिव अनिल वासम, बाळासाहेब मल्ल्याळ, वसीम मुल्ला, विजय हरसुरे, शिवा श्रीराम, विजय मादगुंडी, बालाजी गुंडे, शेखर म्हेत्रे, मधुकर चिल्लाळ, नानी माकम, नवनीत अंकम, दत्ता चव्हाण, दाऊद शेख, जावीद सगरी आदींसह अन्य महासंघाचे सदस्य निधी संकलन मोहिमेत सहभागी झाले होते.