सोलापूर : मागील काही दिवसांपासून सोलापुरातील थंडी वाढली आहे. यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात निच्चांकी किमान तापमानाची नोंद बुधवारी झाली. सोलापूरचे कमाल तापमान बुधवारी ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान १५.५ अंश सेल्सिअस असे नोंदले गेले आहे. किमान तापमान घटल्याने थंडी वाढल्याचे हवामान विभागाने सांगितले.
सोलापूर शहर व परिसरातील किमान तापमानाचा पारा अचानकपणे कमी झाल्याने थंडी प्रखरतेने जाणवू लागली आहे. गारवा वाढल्याने सकाळच्या सत्रात बाहेर पडणार्या लोकांची संख्या कमी झाली आहे. सोलापूरच्या कमाल तापमानातही आता घट होऊ लागली आहे. मागील दोन ते तीन दिवसांमध्ये सोलापूर शहर व परिसरात ३१,३१,३२ अंश सेल्सिअसच्या पुढे कमाल तापमानाची नोंद झाली होती. आज १० अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. सोलापुरातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. कधी हलका पाऊस, हवेत गारवा तर कधी धुक्यांची अंधरलेली चादर असा नयनरम्य चित्र सोलापुरात सकाळच्या सत्रात दिसून येत आहे. थंडी वाढल्याने शहरातील विविध भागात शेकोट्या पेटल्या आहेत.