सोलापूर : रखरखत्या उन्हात फिरताना घामाद्वारे अंगातील पाणी अन् क्षार निघून जाताना एक प्रकारचा अस्वस्थपणा, थकवा जाणवतो. हा अस्वस्थपणा, थकवा घालविण्याबरोबर उन्हाळी आजारांना फाटा देण्यासाठी रसदार फळांच्या ज्यूसचे सेवन करण्याकडे साºयांचाच कल वाढला असून, जारच्या पाण्यावर चालणारे ज्यूस सेंटर हाऊसफुल्ल दिसत आहेत. अतिदक्षता विभागातील रुग्णांसाठी मोसंबी, संत्र्याच्या ज्यूसला अधिक मागणी आहे.
गुरुवारी तापमानाने बेचाळीसी गाठली. ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद शुक्रवारीही दिसून आली. सकाळी अकरा-साडेअकरानंतर उन्हाची तीव्रता जाणवू लागते. रखरखत्या उन्हात अंगाची लाहीलाही होत असताना शरीराचे संतुलन बिघडते.
घामाद्वारे अंगातील पाणी अन् क्षार बाहेर पडत असल्याने थकवा, अस्वस्थपणा जाणवतो. मग अचानक चक्कर येणे, अति तहान लागणे आदी लक्षणे दिसू लागतात. काम करण्याची इच्छाशक्तीच निघून जाते. त्यासाठी रसदार फळे अथवा त्या फळांपासून बनविण्यात आलेल्या ज्यूसचे सेवन केले जाते. सात रस्ता येथील एका सेंटरमध्ये ज्यूस बनविताना नेमक्या कुठल्या पाण्याचा वापर केला जातो ? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी ‘लोकमत‘ चमू थेट प्रक्रियास्थळी पोहोचला. तेथे पाण्याचे १० ते १५ जार दिसून आले. अन्य भागातील काही सेंटरमध्येही जारच्या पाण्यावरच भर देण्यात येत होता.
दुपारी १२ ते दुपारी ४ पर्यंत ज्यूस सेवन करणाºयांची संख्या लक्षणीय असते. त्यानंतर सायंकाळी ५ नंतर मग पुन्हा ही मंडळी चहा घेण्याकडे वळतात. काही ग्राहक चहा आमच्यासाठी टॉनिक आहे. दुपारची झोप झाल्यावर काही जण ज्यूसऐवजी चहाच घेणे पसंत करतात. आंबा, चिक्कू, पायनापल, खरबूज, कलिंगड, डाळिंब, संत्रा, मोसंबी, सफरचंद, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, अंजिर, सीताफळ, रामफळ आदी फळांच्या ज्यूससह बदाम मिल्क शेक, ग्रीन पिस्ता आदी ज्यूस सर्वच सेंटरवर मिळत असल्याने ग्राहकांची गर्दी पाहावयास मिळत आहे.
तपासणीत जारचेच पाणी आढळले- अन्न व औषध प्रशासन विभागाने १० दिवसांपूर्वी शहरातील २५ ज्यूस सेंटरची अचानक तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. ज्यूस बनविताना दर्जेदार पाणी वापरणे बंधनकारक आहे. मात्र काही ठिकाणी बोअर अथवा इतरत्र आणलेल्या साध्या पाण्याचा वापर होतो का ? हे जाणून घेण्यासाठी विभागातील पथकाने ज्यूस सेंटरची कसून तपासणी केली. त्यावेळी या सर्वच सर्व सेंटरवर जारचेच पाणी वापरण्यात येत होते, अशी माहिती अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप राऊत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली.
आॅनलाईनद्वारे घरपोच सेवा...- उन्हाळ्यात ज्यूसला असणारी मागणी लक्षात घेऊन काही कंपन्या आॅनलाईनद्वारे आॅर्डरी घेतात. अवघ्या काही मिनिटात ज्यूसची घरपोच सेवा दिली जाते. एका कंपनीने उन्हाळ्यातील तीन महिन्यांसाठी ज्यूसवर ६० टक्के सूट दिल्याने यंदा ज्यूस सेवन करणाºयांच्या संख्येत वाढ झाली आहे. घरपोच सेवा देताना कुठलाही दर आकारला जात नाही. निवडणूक अन् ज्यूस सेंटवरही नजर- अन्न व औषध प्रशासन विभागात केवळ ८ कर्मचारी आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी हे सर्वच कर्मचारी कामाला लागले आहेत. वास्तविक या विभागात अपुरे कर्मचारी असतानाही लोकसभा निवडणुकीची जबाबदारी पार पाडत असताना शहरातील ज्यूस सेंटवरही लक्ष ठेवून आहेत, असे प्रदीप राऊत यांनी सांगितले.
शहरातील काही ज्यूस सेंटरची अचानक तपासणी केली. तेथे जारच्याच पाण्याचा वापर होत होता. ज्यूस बनविताना दर्जेदार पाण्याचा वापर होत नसेल तर अशांवर कारवाई करु. निवडणुकीचे काम सांभाळताना अधून-मधून ज्यूस सेंटरवर करडी नजर ठेवू.-प्रदीप राऊतसहायक आयुक्त- अन्न व औषध प्रशासन
उन्हाळ्यात अनेक आजार उद्भवतात. शरीरातील पाणी, क्षार कमी झाले तर थकवा येतो. यामुळे आमच्याकडे शुद्ध, दर्जेदार असलेल्या जारच्या पाण्याचा वापर करतो. ग्राहकांची विशेष काळजी घेताना अन्न व औषध प्रशासन विभागाने घालून दिलेले नियम अंमलात आणतो. -रफिक बागवान, ज्यूस विक्रेता
आॅनलाईनद्वारे घरपोच ज्यूस मागविणाºयांची संख्या अधिक आहे. विशेषत: घरातील वृद्ध मंडळींसाठी ज्यूस पोहोच करताना त्यांची सेवा करण्याची संधी मिळते. या सेवेचा मोबदला कंपनी स्वत: अदा करते. सेवादर ग्राहकांवर लादला जात नाही. यामुळे मागणी वाढली आहे.- त्रिमूर्ती बल्लाआॅनलाईन ज्यूस पोहोचवणारा कर्मचारी