मंगळवेढा (सोलापूर) : काश्मीर खोऱ्यात श्रीनगर येथे सेवा बजावताना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील जवान नागप्पा सोमन्ना म्हेत्रे (वय ३४) यांच्या अचानक छातीत दुखू लागले असल्याने सहकाऱ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचे रविवारी रात्री १.००वाजता निधन झाले, त्यांचे पार्थिव मूळ गावी हुलजंती गावात सोमवारी आणण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या हुलजंती येथील नागप्पा सोमन्ना म्हेत्रे हे जवळपास ८ वर्षांपूर्वी भारतीय सेवेत रुजू झाले आहेत ते कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन काळात गेले तीन महिने ते हुलजती गावी सुट्टीवर आले होते. गेल्या १ महिन्यांपूर्वीच ते पुन्हा सेवेत रुजू झाले होते. मात्र, शनिवारी त्यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्व गावावर शोककळा पसरली आहे.
शहीद नागप्पा म्हेत्रे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, दोन भाऊ, असा परिवार असून त्यांच्या वडिलांचे पाच वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. शेतकरी कुटुंबातील नागप्पा यांना केवळ चार एकर जमीन आहे. प्राथमिक शिक्षण हुलजंती तर महाविद्यालयीन शिक्षण बालाजीनगर येथील आश्रमशाळा येथे झाले. त्यांची घरची परिस्थिती हालाखीची असून आई-वडिलांनी मोठ्या कष्टाने शिक्षण पूर्ण करून त्यांस भारतीय सैन्य दलात भरती केले होते श्रीनगर येथे सेवा बजावत असलेले जवान नागप्पा सोमन्ना म्हेत्रे हे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील हुलजती गावचे रहिवाशी आहेत. नागप्पा म्हेत्रे यांचे मोठे भाऊ म्हाळप्पा म्हेत्रे यांना रविवारी रात्री २.३० वाजता फोन आला आणि नागप्पा म्हेत्रे यांचे निधन झाल्याची माहिती श्रीनगर येथील सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.