अरुण बारसकरसोलापूर दि ६ : काही वर्षांनंतर पडलेल्या दमदार पावसाने जमिनीत तर पाणी मोठ्या प्रमाणात मुरलेच शिवाय मध्यम व लघू प्रकल्पातही मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाला आहे. मध्यम व लघू असे ३० प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरले आहेत.सोलापूर जिल्ह्यात यंदा ४ जूनपासून पावसाला सुरुवात झाली होती. साधारण १७ जूनपर्यंत हा पाऊस सुरू होता. त्यानंतर तब्बल दोन महिने पावसाने विश्रांती घेतली होती. दोन महिन्यानंतर सुरु झालेला पाऊस २८ आॅक्टोबरपर्यंत सुरू होता. यावर्षी पुणे जिल्ह्यात व उजनी धरणाच्या परिसरात चांगला पाऊस पडत राहिल्याने भीमा व सीना नदी तसेच कालव्याद्वारे तब्बल दोन महिने पाणी वाहत आहे. याशिवाय मध्यम व लघू तलाव भरल्याने त्याचे पाणी सांडव्यातून मागील काही महिन्यांपासून आजही वाहत आहे. यामुळे नदी कालवा व तलाव भरलेल्या परिसरात आजही पाणीच पाणी आहे. सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद, कृष्णा खोरे महामंडळ, लघुपाटंबाधारे आदी विभागाने मोठ्या प्रमाणावर लहान-लहान साठवण तलाव केले आहेत. त्या तलावातही मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे. त्याची कागदोपत्री नोंद मात्र दिसत नाही; मात्र उजनी धरण, मध्यम प्रकल्प तसेच लघुप्रकल्पातील पाणीसाठ्याची नोंद केली जाते. तीच आकडेवारी यावर्षी समाधानकारक आहे. कृष्णा खोरे विकास मंडळाच्या अखत्यारित जिल्हाभरात ५६ लघू प्रकल्प असून त्यापैकी २६ तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामध्ये बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ, करमाळा, सांगोला, अक्कलकोट तालुक्यातील तलावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांपैकी हिंगणी, पिंपळगाव-ढाळे,बोरी हे पूर्ण क्षमतेने तर आष्टी व मांगी तलावात ९५ टक्के पाणीसाठा आहे.जवळगाव प्रकल्पात ८१ टक्के तर हिप्परगा तलावात ४० टक्के पाणीसाठा झाला आहे.--------------------------उपसा सिंचनाचा आधार- शिरापूर उपसा सिंचन सुरू ठेवल्याने कालव्याला महिनाभर पाणी राहिले. हे पाणी जिरल्याने बीबीदारफळ, नान्नज, वडाळा व गावडीदारफळ परिसरात पाणी पातळी वाढली. याशिवाय बीबीदारफळ, वडाळा ,नान्नज व गावडीदारफळचे लहान-मोठे तलाव भरुन घेतले. यामुळे या गावांचा पाणी प्रश्न निकाली निघाला आहे. ------------------------सांगोल्याचेही तलाव भरले- बीबीदारफळ (उत्तर सोलापूर), पोखरापूर(मोहोळ), शिरवळवाडी, बोरगाव(अक्कलकोट), पाथरी, कोरेगाव, गोरमाळे, कारी, वालवड, काटेगाव, तावडी, ममदापूर, वैराग, कळंबवाडी(बार्शी), पारेवाडी, हिंगणी(के), म्हसेवाडी, वीट, राजुरी, कुंभेज, सांगवी(करमाळा), अचकदाणी, चिंचोली, जुनोनी (सांगोला), पडवळकरवाडी(मंगळवेढा) आदी लघू तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत.- होटगी, शिरवळवाडी, चिक्केहळ्ळी, भुरीकवठे, निमगाव, जवळा, तळसंगी,चिखलगी, डोंगरगाव या तलावात ३५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. - ५६ लघू प्रकल्पांची साठवण क्षमता ४.२४ टी.एम.सी. इतकी असून प्रत्यक्षात २.४१ टी. एम.सी. पाणीसाठा झाला आहे.- लघू प्रकल्पात पाणीसाठा ५६.९१ टक्के इतका झाला आहे.- सात मध्यम प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ७.२३ टी.एम.सी. इतकी असून प्रत्यक्षात ५.६५ टी.एम.सी. पाणीसाठा झाला आहे.- मध्यम सात तलावाची पाणी पातळी ७८.११ टक्के इतकी झाली आहे. बार्शी तालुक्यातील शेळगाव हा एकमेव तलाव कोरडा आहे.
दमदार पावसाने सोलापूर जिल्हा पाणीदार, ३० प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 2:18 PM
काही वर्षांनंतर पडलेल्या दमदार पावसाने जमिनीत तर पाणी मोठ्या प्रमाणात मुरलेच शिवाय मध्यम व लघू प्रकल्पातही मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाला आहे. मध्यम व लघू असे ३० प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
ठळक मुद्देजिल्ह्यात यंदा ४ जूनपासून पावसाला सुरुवात झाली होतीमध्यम व लघू प्रकल्पातही मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा लघू प्रकल्पात पाणीसाठा ५६.९१ टक्के इतका झालासात तलावाची पाणी पातळी ७८.११ टक्के इतकी झालीबार्शी तालुक्यातील शेळगाव हा एकमेव तलाव कोरडा