शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
5
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
6
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
7
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
8
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
9
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
10
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
11
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
12
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
13
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
14
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
15
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
16
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
17
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
18
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
19
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
20
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?

सोलापूर जिल्ह्यात पेपरलेस ग्रामपंचायत योजनेचा बोजवारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:04 PM

ई-ग्राम सॉफ्टवेअर बोगस, संगणक परिचालकांमध्ये जुंपली

ठळक मुद्दे ‘ई-ग्राम सॉफ्टवेअर’ बोगस आणि निकृष्ट ग्रामपंचायतींकडील हस्तलिखिताच्या नोंदी करणे बंद ‘पेपरलेस ग्रामपंचायत’ योजनेचा बोजवारा

राकेश कदम सोलापूर: ई-ग्राम सॉफ्टवेअरच्या माध्यमातून राज्यातील ग्रामपंचायतींचा कारभार पेपरलेस झालाच पाहिजे, यासाठी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे तगादा लावला आहे. त्याचवेळी हे ‘ई-ग्राम सॉफ्टवेअर’ बोगस आणि निकृष्ट असल्याची तक्रार राज्य संगणक परिचालक संघटनेने ग्रामविकास सचिवांकडे केली आहे. अनेक ठिकाणी संगणक परिचालकांनी ग्रामपंचायतींकडील हस्तलिखिताच्या नोंदी करणे बंद केले आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारच्या ‘पेपरलेस                   ग्रामपंचायत’ योजनेचा बोजवारा उडण्याची चिन्हे आहेत.

आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून ग्रामपंचायतींकडील सर्वप्रकारचे दाखले संगणकीकृत देण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने १ एप्रिल २०१८ पासून ग्रामपंचायतींच्या १ ते ३३ नोंदवह्यांमधील हस्तलिखित नोंदी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या कामासाठी ग्रामसेवक आणि आपले सरकार पोर्टलच्या केंद्र चालकाने ग्रामपंचायतीकडील सर्व माहिती ई-ग्राम सॉफ्टवेअरमध्ये भरणे गरजेचे आहे. हे काम तातडीने व्हावे, यासाठी ग्रामविकास विभागाने सर्वच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे तगादा लावला आहे. तर आपले सरकार पोर्टलचे काम करणाºया संगणक परिचालक संघटनेने ई-ग्राम सॉफ्टेवअर बोगस असल्याचे सांगून नोंदी करण्यास नकार दिला आहे.

या सॉफ्टवेअरमध्ये नोंदी करण्यात बºयाच अडचणी आहेत. गेल्या १६ महिन्यांपूर्वीच कंपनीला याबाबत कळविण्यात आले आहे. परंतु, कंपनीकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे (परळी), सचिव मयूर कांबळे, उपाध्यक्ष राकेश देशमुख, सोलापूर जिल्हाध्यक्ष राहुल पेटकर आदींनी केला आहे.

सोलापूर जिल्ह्यात  १०२९ पैकी १९३ ग्रामपंचायतींमध्ये माहिती अपलोड करण्याचे काम पूर्ण झाले. उर्वरित ठिकाणी काम करण्यास केंद्र चालक नकार देत आहेत. 

कंपनी चूक करायला लावत आहेसंगणक परिचालक संघटनेने ९ एप्रिल रोजी ग्रामविकास सचिवांना निवेदन दिले आहे. यात १०० हून अधिक मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. संघटना म्हणते, ई-ग्राम सॉफ्टवेअरमध्ये व्यवस्थित नोंदी होत नाहीत. कंपनी संगणक परिचालकांना जाणून-बुजून चुकीचे काम करायला लावत आहे. गावातील जमिनीचा दर, भाडे मूल्य आदी नोंदी जुळत नाहीत. चुकीच्या नोंदी केल्या तर ग्रामीण भागातील हजारो लोकांना त्याचा त्रास होईल. हे सॉफ्टवेअर आॅनलाईन आणि आॅफलाईनमध्ये असायला हवे. सॉफ्टवेअर डीलिट झाले तर सर्वप्रकारच्या नोंदी पुन्हा कराव्या लागत आहेत, अशा अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. राज्य ग्रामसेवक युनियनने डिसेंबर २०१७ मध्ये ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे ई-ग्राम सॉफ्टवेअरबाबत तक्रार केली होती. या पत्राचा दाखलाही संगणक परिचालक संघटनेने ग्रामविकास सचिवांना दिला आहे.

काय आहे ‘आपले सरकार’ - आघाडी सरकारच्या काळात संग्राम योजनेच्या माध्यमातून हे काम सुरु होते, मात्र सरकार बदलल्यानंतर संग्राम योजना बंद करुन ‘आपले सरकार’ सेवा पोर्टल सुरु करण्यात आले. या योजनेचे काम पाहण्यासाठी सीएससी-एसपीव्ही या कंपनीची नियुक्ती करण्यात आली. या कंपनीमार्फत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार पोर्टलसाठी केंद्रचालक नेमण्यात आले आहेत. ग्रामपंचायतींना संगणक, सॉफ्टवेअर पुरवणे, त्यांची देखभाल दुरुस्ती आणि केंद्र चालकांचे मानधन आदींची जबाबदारी सीएससी कंपनीवरच आहे. या बदल्यात ग्रामपंचायती १४ व्या वित्त आयोगातून ठराविक निधी जिल्हा परिषदांमार्फत या कंपनीला देत आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयgram panchayatग्राम पंचायत