भाजपच्या काही नेत्यांनी काँग्रेसला मतदान केले, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट
By राकेश कदम | Updated: July 7, 2024 19:46 IST2024-07-07T19:06:17+5:302024-07-07T19:46:33+5:30
Sushil Kumar Shinde : काँग्रेसच्या वतीने रविवारी अक्कलकोट रोड येथील एका मंगल कार्यालयात कृतज्ञता मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

भाजपच्या काही नेत्यांनी काँग्रेसला मतदान केले, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या काही नेत्यांनी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना मतदान केले. पण आम्ही या नेत्यांचे नाव घेणार नाही, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी केला. काँग्रेसच्या वतीने रविवारी अक्कलकोट रोड येथील एका मंगल कार्यालयात कृतज्ञता मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
शिंदे म्हणाले, मी आजवर ९ ते १० निवडणुका लढविल्या. यंदाची निवडणूक आमच्या दृष्टीने खूप सोपी होती. मला सर्वांत कमी त्रास या निवडणुकीत झाला. विरोधी पक्षाचे लोक निवडणुकीत पैसे वाटप करीत असल्याच्या तक्रारी आमच्यापर्यंत आल्या. मात्र आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. आम्ही त्यांची पर्वा केली नाही. कारण जनता आमच्या सोबत होती. काँग्रेसला सहकार्य करणाऱ्या भाजप नेत्यांनी नावे घेणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचे काही लोक तिकडे गेले - प्रणिती शिंदे
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, अनेक लोकांना या निवडणुकीत त्रास सहन करावा लागला. काही लोकं मॅनेज होऊन त्यांच्याकडे गेल्याच्या गोष्टी देखील कानावर आल्या. पण आम्ही दुर्लक्ष केले. लोकसभेचा पॅटर्न वेगळा असतो आणि विधानसभेचा वेगळा. ही गोष्ट लक्षात घ्या, असा सल्लाही त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला.