मार्च महिन्यापासून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन बंद ठेवले होते. मात्र, नोव्हेंबर महिन्यापासून पदस्पर्श दर्शन बंद ठेवून मुखदर्शन अटीसह सुरू करण्यात आले आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी करून विठ्ठलाचे मुखदर्शन घडवण्याचे नियोजन मंदिर समितीने केले होते. त्याचबरोबर मंदिरात वाणवसा (वोवसायला) द्यायला, बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही मंदिर समितीच्या महिला सदस्याने इतर महिला भाविकांसह विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेतले आहे. या सर्व घटना मंदिर समितीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बंद झाल्या आहेत. त्या सीसीटीव्हीचे चित्रीकरण मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
----
सर्वसामान्य महिलांवर अन्याय
भाजपच्या कोठ्यातून शकुंतला नडगिरे या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर सदस्य म्हणून नियुक्त झाल्या आहेत. पदस्पर्श दर्शन घेण्यास बंदी असताना त्यांनी संक्रांतीनिमित्त इतर महिलांसह विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेतले. हा सर्वसामान्य महिलांवर अन्याय असल्याचे संभाजी ब्रिगेडचे म्हणणे आहे.
-----
संक्रांतीनिमित्त विठ्ठलाच्या झालेल्या पूजेचे व पदस्पर्श दर्शनाचे चित्रीकरण मिळावे, असे पत्र मंदिर समितीकडे संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आले आहे. याबाबत मंदिर समितीचे सहअध्यक्ष व कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
- बालाजी पुदलावड
व्यवस्थापक, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर
-----