सोलापूर : रात्रीच्यावेळी माझ्या मुलीसोबत का भांडतो म्हणून सासऱ्यासह पाचजणांनी मिळून जावयाला लाकडानं अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर येथे रविवारी रात्री ९:३० च्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये कटेप्पा श्रीमंत पाचशे (वय- ३४) असे जखमी जावयाचे नाव आहे.
या घटनेत जखमी कटेप्पा पारशे आणि त्याच्या पत्नीचे घरासमोर भांडण सुरु होते. ऐ ऐकून अमोगसिद्ध केंगार, परशुराम केंगार यांनी माझ्या मुलीसोबत का भांडतो म्हणून कटेप्पा याला लाकडाने, लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यांच्या सोबतीला मारहाण करण्यासाठी आणखी तिघे धावले.
यामध्ये कटेप्पा याच्या सर्वांगास, डोक्यास व छातीला दुखापत झाली. त्याला उपचारासाठी भाऊ चंद्रकांत याने सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची सिव्हील पोलीस चौकीत नोंद झाली आहे.