हमाल मापाडी महामंडळाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत बार्शी येथील गोदामसमोर सुरू केले होते. कोरोनाच्या काळात हमाल, वारणी आणि मापाडींनी काम चालू ठेवले होते. मात्र, गेली १३ महिने या हमालांचे सोलापूर येथील मनोहर माथाडी संघटनेचे ठेकेदार संदीप गायकवाड यांनी वेतन थकविले. यासाठी गेली दोन दिवसांपासून बेमुदत संप सुरू केला होता. संघटनेच्या सभासद असलेल्या १६ हमालांना १३ महिन्यांची रक्कम न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. मे २०२० ते डिसेंबर २०२० मधील पंतप्रधान गरीब योजनेंतर्गत झालेल्या एकूण हमालीची रक्कम १६ लाख ६८ हजार ९१० व अन्न सुरक्षा योजनेमधील डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२१ पर्यंतची रक्कम १५ लाख २ हजार १२ रुपये असे दोन्ही मिळून ३१ लाख ७० हजार ९०० रुपये आहेत.
ही हमालीची रक्कम संबंधित ठेकेदारांनी माथाडी बोर्डाकडे भरणा केलेला नसल्यामुळे वेतन मिळत नाही. त्यामुळे सोलापूर जिल्हा माथाडी बोर्ड यांनी त्वरित याची वसुली करून हमालांना रक्कम अदा केली होती शिवाय आजपर्यंत जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करूनही दखल घेतलेली नव्हती.
यावेळी तालुकाध्यक्ष गोरख जगताप, संतोष सावंत, लक्ष्मण मुकटे, सुनील फफाळ, महादेव करडे, ताजुद्दीन शेख, यासह नोंदणीकृत सोळा हमाल मापाडी संपात सहभागी झाले होते तर या आंदोलनास मनसे शहराध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांनी पाठिंबा दिला.
----