पीने का बहाना भी नही चाहिये, जाम पे जाम भी नही चाहीये,गला गिला हो जाएबस यही एक तमन्ना है...सोलापूर : कोरोना लॉकडाऊनमुळे गेल्या ४६ दिवसांपासून घरात अडकून असलेल्या तळीरामांची आपल्या लाडक्या दारूविषयी हीच आतुरता आहे.
सोलापुरात दारूची दुकाने कधी सुरू होतील, याबद्दल कोणतीच स्पष्टता नसताना केवळ दुकानांसमोर विक्रीची तयारी सुरू असल्याचे पाहून तळीराम खूश झाले आहेत.
शहरात बहुतांश ठिकाणी दारूची एकल दुकाने आहेत. अन्य दुकाने बंद असल्यामुळे मद्य विक्रेते आपल्या ग्राहकांना फिजिकल डिस्टन्सने उभे करण्यासाठी अवघ्या रिकाम्या रस्त्याचा वापर करीत आहेत.सात रस्ता येथील एका दारू दुकानदाराने तर सुमारे अर्धा किलोमीटरची रांग तयार केली आहे. याठिकाणी ग्राहकांना शिस्तीत उभारण्यासाठी फक्की आखण्यात आली आहे.
सध्या सोलापुरातील उन्हाचा पारा वाढत आहे, या स्थितीत तळीरामांचे उन्हापासून रक्षण करण्यासाठी मंडपही उभारण्यात येत आहेत.