शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

विद्यार्थ्यांच्या मनात सकारात्मक भावनेची पेरणी करा, सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ राजेंद्र भारुड यांचे शिक्षकांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:53 PM

जि.प.च्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक भावनेची पेरणी करावी.

ठळक मुद्देजिल्हास्तरीय टॅलेंट हंट स्पर्धेत यश संपादन करणाºया मुलांनी जि.प.चे सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांच्याशी त्यांच्या कार्यालयात संवादमुलांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना भारुड यांनी दिली उत्तरे प्रत्येकांनी स्वत:च्या कला-गुणांचा वापर विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता विकासासाठी करावा : सीईओ डॉ. राजेंद्र भारुड

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २५ : जि.प.च्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक भावनेची पेरणी करावी. ही सकारात्मता देशाचे उज्ज्वल भविष्य असेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रांतर्गत मुख्याध्यापक कार्यशाळा आणि जिल्हास्तरीय विद्यार्थी गुणवत्ता शोध विद्यार्थी गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. जुळे सोलापुरातील जामगुंडी मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला  शिक्षण विभागाचे सभापती शिवानंद पाटील, उपशिक्षणाधिकारी सुलभा वठारे आदी उपस्थित होते. भारुड म्हणाले, शिक्षकांनी शिक्षण विभागामार्फत सुरु असणाºया नावीन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. कोणत्याही व्यक्तीचे टॅलेंट त्याच्या व्यक्तिमत्त्वावर नसते. तर ते त्याच्यातील कला-गुणांवर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येकांनी स्वत:च्या कला-गुणांचा वापर विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता विकासासाठी करावा.--------------------या विद्यार्थ्यांचा गौरवच्तनिष्का सुरवसे, तन्वी काळे, गार्गी गाडेकर, हार्दिक शहाणे, श्रद्धा पवार, अंजली दाढे (वादविवाद),श्रावणी चौधरी, प्रथमेश पोतदार, लक्ष्मण भोसले, रेवणसिद्ध फुलारी, अनुष्का शेलार, पृथ्वीराज कोळी, प्रीती माळी, अल्फीया शेख (गायन), ओंकार कदम, रेवणसिद्ध फुलारी, सोमनाथ पारसे, श्रीराम उपासे (वादन), बापूराव वगरे, ऋग्वेद जोशी, महेंद्र गादेकर, सारिका करजगी, प्रदीप बनसोडे, प्रणाली होवाळ (नाट्य/एकपात्री), गार्गी चौगुले, तमन्ना गुडील, ईश्वरी सोत्रे, सुवर्णा चव्हाण, सानिका गोरे, सानिया मुलाणी (नृत्य),  विश्वजीत टेळे, ऋतुराज कबाडे, संकल्प गवळी, अंजुम सनदी, प्रतीक्षा खेडकर, शिवरत्न दाढे (प्रश्नमंजुषा), तनिष्का सुरवसे, वैष्णवी बाबर, सार्थक लेंगरे, आरती कचरे, अंजली दाढे, आलीशा सरवदे (वक्तृत्व), आकांक्षा मिरगणे, आफताब पटेल, आर्या आवटे, तन्वी खडके, श्रुती भोसले, सानिका गेजगे, यशराज मोगल, सानिका बिले, वैष्णवी बोराडे, वैष्णवी धस, समीक्षा रामदेवे (चित्रकला)

------------------गुणवंत विद्यार्थ्यांचा भारुड यांच्याशी संवाद च्जि.प. शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर जिल्हास्तरीय टॅलेंट हंट स्पर्धेत यश संपादन करणाºया मुलांनी जि.प.चे सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांच्याशी त्यांच्या कार्यालयात संवाद साधला. मुलांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना भारुड यांनी उत्तरे दिली. शिवाय भारुड यांनी विद्यार्थ्यांना काही सल्लेही दिले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद