सोलापूर : पाऊस नसल्याने यंदा अन्य पिकांप्रमाणेच सोयाबीनचे उत्पादन अल्पसे आले. बाजारात चांगला दर मिळाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी हमीभाव केंद्राकडे फिरकलेही नाहीत. आॅनलाईन नोंदणी केलेल्या अवघ्या दोन शेतकºयांनीही बाजारात विक्रीला पसंती दिली.
सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने बार्शी तालुक्यात सोयाबीनचे पीक घेतले जाते. मराठवाडा लगतच्या अक्कलकोट, उत्तर व दक्षिण तालुक्यातील शेतकरी सोयाबीन घेतात. जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील शेतकरीही सोयाबीनच्या पेरणीचा प्रयोग करु लागले आहेत. पाऊस चांगला असलेल्या मागील दोन-तीन वर्षांत बार्शी, सोलापूर,अक्कलकोट येथील हमीभाव केंद्रावर सोयाबीनची विक्री झाली होती. यावर्षी दुष्काळी स्थितीमुळे अक्कलकोट व सोलापूर या ठिकाणीच हमीभाव केंदे्र सुरू झाली. यापैकी सोलापूर येथील हमीभाव केंद्रावर दोन शेतकºयांनी सोयाबीनची आॅनलाईन नोंदणी केली होती. प्रत्यक्षात एकाही शेतकºयाने हमीभाव केंद्रावर सोयाबीनची विक्री केली नाही. हमीभाव केंद्रावर सोयाबीनला प्रतिक्विंटल ३९०० रुपये दर आहे. बाजारात मात्र सोयाबीनला प्रतिक्विंटल ४२०० रुपयांचा दर मिळाला.
सोलापूर येथील हमीभाव केंद्रावर मूग ३५० व उडीद २९५ तर अक्कलकोट केंद्रावर मूग ४१५ व उडीद ३११ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. प्रत्यक्षात उडीद अक्कलकोट केंद्रावर १९३ शेतकºयांचा ७४४ क्विंटल तर सोलापूर केंद्रावर १०१ शेतकºयांचा ३२५ क्विंटल खरेदी झाला आहे. अक्कलकोट केंद्रावर १८५ शेतकºयांचा मूग १४३० क्विंटल तर सोलापूर केंद्रावर १४५ शेतकºयांचा ६६९ क्विंटल खरेदी झाला आहे.
नोंदणी ४२२ अन् खरेदी ४२ ...- यावर्षी अक्कलकोट, बार्शी, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ या तालुक्यात मका पाहावयाला मिळाली नाही. मका हमीभाव केंदे्रही अकलूज, मंगळवेढा, पंढरपूर व नातेपुते या ठिकाणी सुरू झाली आहेत. याठिकाणीही म्हणावा तसा प्रतिसाद नसल्याचे आकडेवारीवरुन दिसते. चार केंद्रावर ४२२ शेतकºयांनी नोंदणी केली; मात्र ४२ शेतकºयांनीच मका विक्री केली. अकलूज केंद्रावर १८० शेतकºयांनी नोंदणी केली असली तरी १२ शेतकºयांची ४९९ क्विंटल, मंगळवेढा केंद्रावर १२५ शेतकºयांनी नोंदणी केली; मात्र एका शेतकºयाने १३ क्विंटल, पंढरपूर केंद्रावर नोंदणी केलेल्या ४० पैकी २५ शेतकºयांची ६७२ तर नातेपुते केंद्रावर नोंदणी केलेल्या ७७ पैकी ४ शेतकºयांची १९१.५० क्विंटल मका विक्री झाली.
नोंदणी १ हजार ३७१- अक्कलकोट व सोलापूर येथील हमीभाव केंद्रावर मूग विक्रीसाठी ६०६ व उडीद ७६५ अशा एकूण १३७१ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. प्रत्यक्षात हमीभाव केंद्रावर मूग ३३० व उडीद २९४ अशा एकूण ६२४ शेतकºयांनी विक्री केला. हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकºयांनी बाजारात धान्य विक्री केल्याचे सांगण्यात आले.