मकर संक्रातीचं औचित्य साधून दरवर्षी तिळगूळ देऊन गोड बोलण्याचा संदेश सर्वत्र दिला जातो. भटक्या विमुक्तांच्या दृष्टीकोनातून विचार करताना अनेक यक्ष प्रश्न निर्माण होताना पदोपदती दिसताहेत. त्यांच्यावर प्रेम करा, स्थैर्य देऊन जगण्याचा हक्क द्यावा, अशी अपेक्षा या निमित्ताने करावीशी वाटते.
देशभर ८ कोटींच्या संख्येनं असलेल्या या भटक्या विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना व्हायला हवी. समाजव्यवस्थेनं, सरकारनामक व्यवस्थेनं हे आपलेच भाऊबंद आहेत. या जाणिवेतून त्यांना आपलंस करा.
स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षातही त्यांना माणूस म्हणून जगता येत नाही. तळातले जीवन जगणाºया या लोकांकडं प्राधान्यानं लक्ष दिलं पाहिजे. समाजात जगण्यासाठी त्यांना पर्याय मिळवून दिला पाहिजे. समाजात काय चाललंय याची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण होत नाही. कारण त्यांच्या मूलभूत समस्याच अद्याप सुटलेल्या नाहीत. गोड बोलण्यासारखं त्यांच्या आयुष्यात घडण्याचा प्रयत्न निर्माण व्हावा. ही मंडळीही मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी आसूसली आहेत.
विखुरलेल्या भटक्या भाऊबंदाना प्रस्थापित व्यवस्थेकडून मायेची फूंकर हवी आहे. ‘आम्हालाही तुमच्यासारखं जगायचंय’ या त्यांच्या भावनेला सरकारकडून ठोस अभय हवं आहे. खºया अर्थानं गूड अन् गोड बोलण्यासाठी त्यांचं आयुष्य कसं गोड होईल याकडं सगाजव्यवस्थेनं बघायला हव.- बाळकृष्ण रेणके, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते