महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब आंधळकर, सोलापूर जिल्हा नशीबचे जिल्हाध्यक्ष दीपक आंधळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी येथील लिंगायत बोर्डिंग मंगल कार्यालय येथे सोमवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत हा मेळावा पार पडला. यात तब्बल १५४२ महिलांनी नावनोंदणी केली.
संयोजकांच्या वतीने मेळाव्यास आलेल्या महिलांसाठी श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी बार्शी व इनरव्हील क्लब यांच्या वतीने मोफत रक्ततपासणी करून रक्तातील १८ घटक चाचण्या केल्या व रक्तगट तपासणी मोफत करण्यात आली.
प्रमुख पाहुणे नशीबचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास बोराडे, राष्ट्रीय सचिव ओंकार बोराडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शैलेश कोंडगावकर यांनी महिला नवउद्योजक सुशिक्षित बेकार मेळाव्यास आलेल्या सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी वैरागच्या शलाका मरोड यांनीही महिलांना मार्गदर्शन केले.
मेळाव्यासाठी वर्षाताई ठोंबरे, निवेदिता आरगडे, सुप्रिया गुंड-पाटील, इनरव्हील क्लबच्या हेमा कांकरिया, गौरी रसाळ, गुंजन जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल कुलकर्णी यांनी केले. आभार नशीब महासंघाचे जिल्हा अध्यक्ष दीपक आंधळकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नसीबचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते, महिला शिवसेनेच्या पदाधिकारी, राजमाता इंदूताई आंधळकर अन्नछत्रालयाचे कार्यकर्ते व स्टार फाउंडेशनचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.
----
-६९०० जणांसाठी रोजगारनिर्मिती
नशीब महासंघ केंद्र शासन, निधी आयोग, कौशल्य विभाग यांच्याशी कायदेशीर संलग्न आहे. महिला बचतगट, शेतकरी, कामगार, युवक-युवती बेरोजगारांना सुवर्णसंधी असून, बार्शी शहर व तालुक्यात ६,९०० जणांसाठी रोजगारनिर्मिती करणार आहे. प्रत्येक खेडेगावामध्ये पन्नास जणांना व २ हजार जणांना बार्शी शहरामध्ये व्यवसाय, शेळीपालन, गोपालन, शेतीपूरक उद्योग, शेतमाल प्रक्रिया उद्योग, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, मसाले, चटणी, पापड आदी उद्योगांसाठी एक लाखापासून दहा लाखापर्यंत फाईल तयार केली जाईल. बँकेकडून मंजुरी मिळवून दिली जाईल. यात कर्जदाराना १० टक्के मार्जिन मनी, तसेच केंद्र व राज्य शासनाची १५ ते २५ टक्के सबसिडी मिळवून देण्यात येणार आहे.नवउद्योजकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नशीबचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास बोराडे यांनी स्पष्ट केले.
भाऊसाहेब आंधळकरांचा सन्मान
भाऊसाहेब आंधळकर यांनी कोरोना विषाणूच्या काळात लाखो गोरगरीब जनतेला जेवणाचा पुरवठा केल्याबद्दल इंडिया बुक रेकॉर्ड त्यांच्या वतीने गौरव करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आंधळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
----