शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

सोलापूर जिल्ह्यातील सर्व आगारातून एस.टी. बस धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2020 11:30 AM

सोलापूरलाही मिळाली परवानगी; कोरोना वॉरियर्स चालक, वाहक सज्ज

ठळक मुद्देशासनाने दिलेल्या सर्व सूचना पाळून एसटी प्रशासनाच्या वतीने एसटी सेवा सुरू प्रत्येक एस. टी. बसमध्ये जास्तीत-जास्त २२ प्रवाशांनाच प्रवास करता येणार ज्येष्ठ नागरिक आणि दहा वर्षांच्या आतील मुलांना प्रवास करता येणार नाही

सोलापूर : गेली अडीच महिने राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागातील सर्वच आगारांमध्ये जागीच थांबलेल्या एस. टी. बस आता सोमवार दि. ८ जूनपासून धावणार आहेत; याचबरोबर सोलापूर आगारातूनही बस सोडण्याचा निर्णय रात्री उशिरा झाला असल्याचे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी स्पष्ट केले. प्रवाशांच्या प्रतीक्षेत बसलेले चालक अन् वाहक कोरोना वॉरियर्स म्हणून सज्ज झाले आहेत. 

प्रवाशांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असणारी एसटी सेवा पुन्हा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सोमवारपासून सोलापूर विभागातील सर्व आगारातून एस. टी. गाड्या धावण्यास सुरुवात करणार आहे. यासाठी आगारांनी नियोजनही केले आहे. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन जादा एस. टी. गाड्या सोडण्यात येणार आहेत. याबाबत सर्व अधिकार स्थानक प्रमुखांना देण्यात आले आहेत. 

२२ मे रोजी सोलापूर विभागातील आठ आगारातून गाड्या सुरु करण्यात आल्या होत्या. तेव्हा हवे तेवढे प्रवासी मिळत नसल्याने काही भागातील गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी एक-दोन प्रवाशांना घेऊन एस. टी. गाड्या धावल्या. हा अनुभव लक्षात घेऊन प्रशासनाने सोमवारपासून काही मोजक्याच गाड्यांचे नियोजन केले आहे. प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला तर जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. काही आगारांमधून तालुक्यांतर्गत गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणाला सोलापूरला यायचे असेल तर अशा प्रवाशांची मात्र गैरसोय होणार आहे. सोलापूर आगारातूनही गाड्या सोडण्याचे लवकर नियोजन करण्यात येणार असल्याचे संकेतही मिळत आहेत. 

एकावेळी २२ प्रवाशांनाच करता येणार प्रवास- प्रत्येक एस. टी. बसमध्ये जास्तीत-जास्त २२ प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर एका सीटवर एका प्रवाशास बसता येणार आहे. चालकाच्या हाती गाडी देताना पूर्ण सॅनिटायझर करून देण्यात येणार आहे. प्रत्येक फेरीनंतर गाडी स्वच्छ केली जाणार आहे. त्याचबरोबर सर्व सवलतीचे पास बंद असणार आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि दहा वर्षांच्या आतील मुलांना प्रवास करता येणार नाही. 

शासनाने दिलेल्या सर्व सूचना पाळून एसटी प्रशासनाच्या वतीने सोमवारी एसटी सेवा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी अधिकाºयांना विविध सूचनाही देण्यात आल्या आहेत. याचबरोबर प्रवाशांनीही आवश्यक ती काळजी घेऊनच प्रवास करावा.-रमाकांत गायकवाड, विभाग नियंत्रक

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याST Strikeएसटी संप