कुर्डूवाडी : शुक्रवारी दुपारी सुमारे पावणे चार वाजता कुर्डुवाडीहून पंढरपुरकडे निघालेल्या एस टी बस ( एमएच २० बी. एल. ४१४६) ला पंढरपूरकडून येणाºया दुसºया (एमएच १४ बी टी ०९४७) या एस टी बसने भरधाव वेगात येऊन कट मारल्याने पंढरपुरकडे निघालेली एस टी बस पलटी झाली.
या अपघातात लऊळ (ता. माढा) येथील बस थांब्यावरुन पडसाळी,बावी,चिंचोली,भेंड, भुताष्टे परिसरातील लऊळच्या श्री संत कुर्मदास विद्यामंदिरात शिकणारे सुमारे २५ ते ३० विद्यार्थी बसमध्ये बसले होते. तीच एस टी बस पलटी झाल्याने सर्व विद्यार्थी जखमी झाले आहेत़ याचबरोबर यामध्ये ९ ते १० प्रवासीही जखमी झाले असून त्यांच्यावर कुर्डुवाडी ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये कोणीही गंभीर जखमी नसून किरकोळ व मध्यम स्वरूपाचे जखमी आहेत. त्यांना ग्रामीणचे अधिक्षक डॉ.संतोष अडगळे यांच्यासह इतर वैद्यकीय पथक उपचार करीत असून विद्यार्थ्याना भेटण्यासाठी ताबडतोब तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी येऊन विचारपूस केली आहे. ही घटना पालकांना समजताच रूग्णालयात पालकांची मोठी गर्दी झाली होती.
एस टी बस क्र एम एच २० बी एल ४१४६ या कुडुर्वाडी- पंढरपुर गाडीत विद्यार्थी व प्रवासी गणेश मुटकुळे, ज्ञानेश्वर मुटकुळे,ऋषीकेश फरड, सुयश मुटकुळे, आदित्य फरड, तनुजा रोडगे, साक्षी फरड, स्वीटी फरड, सानिका राऊत, आरती फरड, स्नेहल इंगवले, मंदाकिनी कदम, सरिता इंगवले, अरुण निंबाळकर, हिराबाई माने, सुलट अटकुळे, सोजर सोलनकर, मनीषा फरड, चांगुणा सपाटे, अजित फरड आदींसह इतरांचा समावेश आहे.