ऑनलाइन लोकमत
करमाळा, दि. २ - सोलापूर जिल्ह्यातील पारेवाडी-करमाळा एसटी बसला शुक्रवारी सकाळी अपघात झाला. पण चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठी जिवीतहानी टळली. पारेवाडीहून करमाळयाच्या दिशेने चाललेली एसटी बस राजुरीच्या उताराला खड्यात कोसळली.
एसटी उताराला लागताच चालक बाळू यादव याने एसटीवर नियंत्रण मिळवले. अन्यथा एसटी विहीरीत पडून मोठा अनर्थ ओढवला असता. एसटी जिथे थांबली तिथून विहीर १० फूट अंतरावर होती.
एसटीमध्ये २० प्रवासी बसले होते. अपघातामध्ये एसटीचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी, सर्वात महत्वाची म्हणजे जिवीतहानी टळली.