सोलापूर : भाऊ बहिणीचे नात्यात प्रेमाचा गोडवा वाढवणारा सण म्हणजेच रक्षाबंधन पुढील काही दिवसात येणार आहे. यासाठी प्रवाशांच्या सोईसाठी एसटी विभागाकडून जादा एसटी गाड्यांची सोय करण्यात आली आहे. यासाठी सोलापूर विभागातून जवळपास ५० पेक्षा जास्त गाड्या सोडण्यात येणार आहे. यातील बहुतांश गाड्या पुणे व मुंबईच्या मार्गावर धावणार आहेत.
सोलापुरातून मुंबई व पुणे येथे जाणार्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. यामुळे या मार्गावर सोलापूर विभागातील सोलापूर, पंढरपूर, अकलूज, मोहोळ आदी आगारातून पुणे साठी विशेष गाड्यांचे नियाेजन करण्यात आले आहे. म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी भाऊ-बहिणीच्या भेटीसाठी एसटी कर्मचारी जास्त कष्ट सोसणार आहेत.