आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : कन्नड साहित्य परिषदेच्यावतीने आयोजित महाराष्ट्र राज्य कन्नड साहित्य संमेलनास शनिवार ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता हुतात्मा स्मृती मंदीरात प्रारंभ झाला़ प्रारंभी संमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळी ८ वाजता ध्वजारोहन समारंभ पार पडला़ संमेलनाचे उदघाटन भालकी हिरेमठ संस्थानचे डॉ़ बसवलिंग पट्टदेवरू, होटगी मठाचे डॉ़ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, कर्नाटक राज्याचे जलसंपदा मंत्री एम़बी़पाटील, कन्नड परिषद, बंगळूरचे अध्यक्ष डॉ़ मनु बळीगार, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष बसवराज मसुती यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते़ दरम्यान, खा़ शरद बनसोडे, महापौर शोभा बनशेट्टी यांच्या उपस्थितीत स्मरणिका प्रकाशन करण्यात आले़ यावेळी महिलांनी कन्नड दिप गीत सादर करून सर्वांची मने जिंकली़ याचवेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले की, मंगळवेढ्यातील बसवेश्वरांचे स्मारक लवकरच पूर्ण करणार असल्याचे सांगितले़
कन्नड साहित्य संमेलनास सोलापूरात प्रारंभ
By admin | Published: July 08, 2017 12:36 PM