बार्शी पंचायत समितीत अधिकारी, ग्रामसेवक व कर्मचारी यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला पंचायत समितीचे सभापती अनिल डिसले, उपसभापती मंजुळा वाघमोडे, जि. प. सदस्य मदन दराडे, किरण मोरे, पं. स. सदस्य इंद्रजित चिकणे, अविनाश मांजरे उपस्थित होते.
आढावा सभेमध्ये पंचायत समितीचे कडील कनिष्ठ सहायक आनंद साठे यांनी ग्रामसेवक संवर्गाचे मूळ सेवा पुस्तक क्यूआर कोडव्दारे ग्रामसेवक यांचे मोबाईलमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध करुन दिल्याने या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल त्यांचा सत्कार करून हा उपक्रम सर्व जिल्हाभर राबविणार असल्याचे सांगितले.
या बैठकीसाठी गटविकास अधिकारी शेखर सावंत, आडसूळ, कराड, आर. सी. लोखंडे, डी. बी. अवघडे, ग्रामसेवक युनियनचे अंकुश काटे, महेश गिराम व बाळासाहेब झालटे यांनी परिश्रम घेतले.
या विषयावर झाली चर्चा
आढावा बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)/ रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारची आवास योजना घरकुल, रजिस्ट्रेशनचे कामे, पेपरलेस ग्रामपंचायत काम, ई-ग्राम स्वराज, ग्रामपंचायतीकडील करवसुली व पाणीपट्टी वसुली, अपंगाच्या उन्नतीसाठी ५ टक्के रक्कम खर्च, महिला बालकल्याण १० टक्के व मागासवर्गीय १५ टक्के खर्च, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना या विविध विषयांचा सखोल आढावा घेण्यात आला.
फोटो
०६बार्शी-सत्कार
ओळी
ग्रामसेवकांचे सेवापुस्तक मोबाईलमध्ये अध्ययावत केल्याबद्दल आनंद ताटे यांचा सत्कार करताना सीईओ दिलीप स्वामी, सभापती अनिल डिसले, उपसभापती मंजुळा वाघमोडे आदी.