परिवर्तन कला महासंघ व माळशिरस तालुक्यातील सर्व कलाकारांच्या वतीने अकलूज प्रांताधिकारी कार्यालयासमोर भिक्षा मांगो आंदोलन केले. कलाकारांनी कर्जाने भांडवल घेऊन वाद्य पार्ट्या उभ्या केल्या आहेत. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून वाद्य व्यवसाय ठप्प झाला आहे. उसनवारी करून, कर्ज काढून आम्ही आमच्या पोटाची भूक भागवीत आहोत. आमच्यावर कर्जबाजारी व उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून सर्व कलाकारांनी देशभक्ती गीते, भावगीते, अभंग गात आंदोलन केले.
या आंदोलनात कला परिवर्तन महासंघाचे केंद्रीय संघटक शाहीर राजेंद्र कांबळे, माळशिरस तालुकाध्यक्ष धनंजय भोसले, उपाध्यक्ष बापूसाहेब गेजगे, नितीन गेजगे, अकलूज शहराध्यक्ष नितीन साठे, बाबू जाधव, महिला आघाडी शहराध्यक्ष स्वाती वाघे, अमोल जगताप, उत्तरेश्वर ओहाळ, पिंटू कांबळे, सचिन खिल्लारे, नितीन मोरे, राहुल धाईंजे, कुंडलिक पारसे, गणेश कांबळे, खांडेकर, महादेव आरगडे, किरण गायकवाड आदी सहभागी झाले होते.