कुडूर्वाडी : सध्या महाविद्यालये सुरू झाली आहेत. मात्र, खेड्या गावा तून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एस.टी. महामंडाळाने बसेस सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी खासगी वाहनांचा वापर करीत आहेत. त्यामुळे भुताष्टे, पडसाळी, लऊळ, ढवळस, बारलोणी, कव्हे, रोपळे मार्गावरील एस.टी. बसेस सुरू करण्याची मागणी होत आहे.
कुर्डूवाडीत अंतर्गत रस्ते उखडले
कुडूर्वाडी : शहरात सुरू असलेल्या अंतर्गत गटारीमुळे सर्व अंतर्गत रस्ते उखडले आहेत. या खराब रस्त्यावरून प्रवास करताना दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत आहे. त्यातच काही ठिकाणी अर्धवट कामामुळे नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. गटारीची अंतिम टप्प्यातील कामे लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
कुर्डूवाडीत धुळीचे प्रमाण वाढल
कुर्डूवाडी : शहरात सुरू असलेल्या कामांमुळे कुर्डूवाडीत धुळीचे प्रमाण वाढले आहे. शहरात श्वसननलिकेचे रुग्ण आढळत आहेत. शहरात खोकला या संसर्गजन्य आजाराचेही रुग्ण आढळत आहेत. टँकरने पाणी मारून धूळ आटोक्यात आणण्याची मरागणी होत आहे.
उडगी-सातनदुधनी रस्ता खराब
उडगी : अक्कलकोट तालुक्यातील उडगी-सातनदुधनी पाच किलो मीटर रस्ता खराब झाला आहे. या रस्त्यावरून ऊस वाहतूक, शेती मालवाहतूक ,शाळकरी मुले दररोज ये-जा करतात. रस्त्याच्या दुतर्फा बाजूला काटेरी झाडीझुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे रस्ता दिसत नाही आणि अपघात घडत आहेत. नवीन रस्ता करावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
बोरी नदीच्या पुलावरील रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी
उडगी : अक्कलकोट तालुक्यातील सातनदुधनी येथील बोरी नदीच्या पुलावरून मैंदर्गीला जोडणारा रस्ता हा अतिवृष्टीत वाहून गेला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित दुरुस्ती करावा, अशी मागणी नागरिकातून होत आहे.