सोलापूर : मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरातील नागरीकांकरीता पिण्याच्या पाण्यासाठी करीता दुहेरी पाईप लाईनचे काम त्वरीत सुरु करण्याची मागणी केली.
यामध्ये कर्नाटक राज्याने जरी पाणी उचलले तरी सोलापूर शहराकरीता पिण्याचे पाणी हे उजनी धरणातून येत असून ते पुरेसे आहे, परंतू सदर पाण्याचे योग्य नियोजन करण्यात येत नाही. सोलापूर शहरामध्ये सद्यस्थितीमध्ये ६ दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले की, एनटीपीसी प्रोजेक्ट कडून दुहेरी पाईप लाईन करण्यात असून त्याचे वारंवार रिटेंडर प्रोसेस करण्यात येत आहे. यामध्ये मा. उपमुख्यमंत्री साहेबांनी लक्ष देवून सदरच्या दुहेरी पाईप लाईनचे काम त्वरीत सुरू करावे. कारण येत्या उन्हाळ्यामध्ये नागरिकांची गैरसोय होणार नाही अशी मागणी आ. प्रणिती शिंदे यांनी केली.
मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शहरातील नागरिकांना कधी चार तर कधी सहा दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यातच काही भागात दुषित तर काही भागात कमी दाबाने पाणी मिळत असल्याने सोलापूरकर चांगलेच वैतागले आहेत. महापालिकेकडे तक्रार, आंदोलन, मोर्चा काढूनही महापालिकेचे अधिकारी कोणत्याच प्रकारची ठोस कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांत शहरातील विविध पक्षाने पाण्यासाठी महापालिकेसमोर आंदोलन केले आहे.