शीतलकुमार कांबळे, सोलापूर : महाराष्ट्र राज्य अंतराळ महासंघ व राज्य अभियंता संघटनेने मागील चार महिन्यांपासून निधीसाठी आंदोलन केले. या आंदोलनाला यश आले असून शासनाकडून साडेचार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवार २७ जून रोजी राज्य तसेच जिल्हास्तरावरील मागे घेतले आहे.
राज्यात ६४ हजार कोटी रुपयांची कामे मंजूर आहेत. यापैकी १५ हजार कोटींची कामे झाली असून, यातील अनेक कामांची देयके देण्यात आलेली नाहीत. सोलापूर जिल्ह्यासाठी १२०० कोटींची कामे मंजूर झाली आहेत. त्यातील ४० कोटींची कामे झाली असून, अनेक कामांची देयके प्रलंबित आहेत. या विरोधात संघटनेकडून काम बंद करण्यात आले होते.
आंदोलन स्थगित करून काम करण्यास सुरुवात करावी अशी विनंती शासनाकडून संघटनेकडे करण्यात आली होती. पुढील काळात कामे झाल्यावर बरोबर तातडीने देयके देणे, निधीची व्यवस्था करणे, कामास निधीची व्यवस्था करूनच कामे मंजुरी करणे , तसेच कंत्राटदार यास संरक्षण कायदा, तसेच आधिकारी यांना कंत्राटदार यांचे देयके लिहून देणे व इतर कंत्राटदार यांची अडचणी तत्काळ सोडवाव्यात असे सांगण्यात आले. याबाबत शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे संघटनेने यापूर्वी जाहीर केलेले गुरुवार २७ जून रोजीचे राज्यभरातील सर्व जिल्ह्यामध्ये होणारे आंदोलन सध्या स्थगीत केल्याचे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे राज्याध्यक्ष मिलिंद भोसले यांनी सांगितले.