सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डाॅ.ना. तानाजीराव सावंत यांचा शनिवार १७ सप्टेंबर २०२२ रोजीचा सोलापूर दौरा अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख मनोज शेजवाल यांनी दिली.
दरम्यान, आरोग्यमंत्री सावंत हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर येणार होते. शनिवारी दुपारी ४ वाजता सोलापूर शहरात आगमन होणार होते. त्यानंतर ते तुकाराम मस्के यांनी आयोजित केलेल्या नेत्र शिबिरास भेट देणार होते. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता वीरशैव लिंगायत समाज यांच्यावतीने आयोजित सत्कार समारंभास ते उपस्थित राहणार होते. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात ते कार्यकत्र्यांशी संवाद साधणार होते. त्यानंतर शिवसेना शहर प्रमुख मनोज शेजवाळ यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन रात्री ७ नंतर ते पुण्याकडे रवाना होते. मात्र अपरिहार्य कारणामुळे त्यांचा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले.
सावंत हे मंत्री झाल्यापासून दुसऱ्यांदा सोलापूर दौऱ्यावर येत होते. त्यांच्या दौऱ्यानिमित्त पक्षाच्यावतीने मोठी तयारी करण्यात आली होती. मात्र अचानक दौरा रद्द झाल्याने सगळे कार्यकर्ते नाराज झाल्याचे सांगण्यात आले.