मागणी सप्ताह २१ जून ते २६ जून २०२१ राबविण्यात येणार आहे. यामध्ये सातव्या वेतन आयोगाचा लाभ विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांना तातडीने द्यावा, आश्वासित प्रगती योजनेचे १२ व २४ वर्षांचे रद्द झालेले शासन आदेश पुसरुज्जीवित करून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा, या मागण्यांचे पोस्टर हातात धरून त्याचे फोटो काढून ते मुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, उपमुख्यमंत्री, संचालक व सहसंचालक उच्च शिक्षण यांना मेल, फेसबुकला, ट्विटरला टॅग व मेसेज करणार आहेत. तर सातवा वेतन आयोग मिळेपर्यंत खिशाला काळ्या फिती लावणे, लाक्षणिक उपोषण, निदर्शन आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष तानाजी ठोंबरे यांनी दिली आहे. निवेदनावर तानाजी ठोंबरे, कॉ. ए. बी. कुलकर्णी, कॉ. प्रवीण मस्तूद, आरती रावळे, उमेश मदने, विलास कोठावळे, हनुमंत कारमकर यांच्या सह्या आहेत.
---