कुसळंब : कोरोनाच्या प्रादुर्भावासाठी रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्या पुढाकाराने सॅनिटायझरची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोण रुग्णाची संख्या वाढत असताना गावातील वातावरण आरोग्यदायी ठेवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला. यासाठी कुसळंब गावात घरोघरी घरी फवारणी करण्यात आली.
कुसळंब येथील ग्रामपंचायतच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. गावातील शिवाजी चौक, तुळजा भवानी चौक, शिंदे गल्ली, काशीद गल्ली, कृष्णा नगर, भीम नगर, मातंग वस्ती, शिंदे मळा रस्त्याची साफसफाई करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. गावात दवंडी देऊन चाचण्या वाढविण्यात आल्या. गावात दवंडी देऊन जनजागृती करण्यात आली. तसेच गावक-यांसाठी कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन सरपंच शिवाजी खोडवे, उपसरपंच किशोर काशीद, रोहित शिंदे यांनी केली.
यावेळी विनोद पवार, अनिकेत ठोंगे, गुजर, शिंदे, धनाजी काशिद, ग्रामसेवक मिनाज मुलानी, वैभव पोटरे, अजित ननवरे उपस्थित होते.