कार्यकारी अभियंता उजनी जलविद्युत विभाग इंदापूर या विभागांतर्गत उजनी जलविद्युत उपविभाग क्रमांक १ चे मोहोळ येथील कार्यालय सोलापूर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला आहे. तो निर्णय रद्द करून ते कार्यालय मोहोळ येथेच ठेवावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
शहराच्या विकासाला पूरक असणारे अनेक विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. बस डेपो, जिल्हा उप रुग्णालय, क्रीडा संकुल असे प्रश्न प्रलंबित असतानाच शहरातील अशी कार्यालये बाहेर जात आहेत. त्यामुळे शहराचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. याचाच एक भाग म्हणून मोहोळ येथे कार्यरत असणारे उजनी जलविद्युत उपविभाग क्रमांक १ चे मोहोळ येथील कार्यालय सोलापूर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे त्या कार्यालयाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांसह उद्योगावर परिणाम होणार आहे. त्यामुळे हे कार्यालय मोहोळ येथे ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली. तहसीलदार जीवन बनसोडे यांना निवेदन दिले.
फोटो
१७मोहोळ०१
ओळी
उजनी जलविद्युत उपविभागाच्या कार्यालयाचे स्थलांतर थांबवावे, याचे निवेदन तहसीलदार जीवन बनसोडे यांना देताना माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर.