सोलापूर - कुर्डूवाडी-बार्शी रस्तावरील सम्राट अशोक नगर येथील चौकातील उपअभियंता विज वितरण कंपनीच्या कार्यालया जवळील रस्त्यावर ढवळस ग्रामस्थांनी गुरूवारी सकाळी अकरा वाजता विद्युत वितरण पुरवठा तातडीनं सुरळीत व्हावा या मागणीसाठी अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी कुर्डूवाडी शहराचा बाजार दिवस असल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे पोलीसांनी या आंदोलनात हस्तक्षेप करत शेतकरी आंदोलकर्त्यांना संबधित वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर करुन आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.
यावेळी वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता दिनेश चव्हाण यांनी आंदोलकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले व येथून पुढे विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे यांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.